रुग्णांचे नमुने आरोग्य विभागाने घेणे केले सुरू गावात; धूर फवारणी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील जंगलतांडा येथे धूर फवारणी केली सुरुवात धूर फवारणी करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी जंगला तांडा गावात प्रणव प्रेमसिंग चव्हाण वय ११वर्ष या बालकाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. यानंतर आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शनिवारी आरोग्य विभागाने गावात धूर फवारणी केली, तर ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.दरम्यान, शनिवारी आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात डेंग्यूसदृश तापाचे आणखी एक रुग्ण आढळून आला. या रुग्णाचे रक्त नमुने पुणे
येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. तसेच दोन गंभीर म रुग्णांवर सोयगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघांवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. शनिवारी ग्रामपंचायतीच्या वतीने गटारात साचलेली घाण व रस्त्यावरील केरकचऱ्याची विल्हेवाट लावली असून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना प्रतिबंध घातला आहे. तसेच औरंगाबादहून आलेल्या जिल्हा हिवताप नियंत्रण पथकाने जंगला तांडा येथे धुरफवारणी केली. औरंगाबाद येथील हिवताप अधिकारी ढोले यांनी रुग्णास भेट दिली.
Users Today : 12