सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील माळेगाव येथे दि 12-11-2022 रोजी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र कृषि विभागामार्फत “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम उत्पादकता वाढ व बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी जे के जाधव यांनी पिक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या कृषी विषयक समस्या जाणून घेतल्या. तसेच कृषि सहाय्यक परीक्षित पाटील यांनी कृषि यांत्रिकीकरण, महाडिबीटी,फळबाग योजना, मागेल त्याला शेततळे योजना, लोकसहभागातुन वनराई बंधारे याविषयी माहिती दिली व रब्बी ज्वारी व हरभरा बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी कार्यक्रमास गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी यांची उपस्थिती होती.
Users Today : 12