राजपूत/परदेशी समाजाला आजच जागृती ची गरज का आहे? धोंडीराम राजपूत

Khozmaster
2 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका वैजापूर शहरात रविवारी रोजी राजपूत/परदेशी समाज हा विखुरलेला भटका समाज आहे,त्यांच्या या विखुरलेल्या  वृत्तीचा फायदा इतिहासात अनेकांनी घेतला, आजही अनेक जन घेतआहे.मात्र हा समाज काल जेथे होता,तो आजही तेथेच आहे.काल दुसऱ्याची चाकरी करीत होता आजही तीच चाकरी करीत आहे.काल बड्यांची हांजी, हांजी आजही होत आहे.मात्र या  समाजाच्या अडचणी, समस्या,प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही ठोस प्रयत्न काल केले नाही व आजही कोणी करीत नाही त्यामुळे उद्या येणारी नवी पिढी या समाजाला माफ करणार नाही.या साठी स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी या समाजाने आज जागृक होऊन  भविष्यातील मुलां-बाळांच्या उन्नती,शैक्षणिक विकास, सामाजिक विकासासाठी आज जागरूक होण्याची नितांत गरज आहे.असे प्रतिपादन वैजापूर येथे राजपूत/परदेशी समाजाच्या बैठकीत जेष्ठ समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत यानी केले.पुढील महिन्यात औरंगाबाद येथे राजपूत/परदेशी समाजाचा
मेळावा आहे त्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते,ते पुढे म्हणाले की,देशाच्या मातीशी एकनिष्ठ राखणाऱ्या या समाजाने अनेक अन्याय,अत्याचार सहन केलेले आहेत, व आजही काही समाजकंटक या समाजाच्या शासकीय सोयी, सवलती मध्ये आडकाठी बनत आहे.अशा  समाज विघातक वृत्तीना आला घालण्यासाठी ही समाज संघटित होणे ही काळाची गरज आहे. या दोन्ही समाजाने रोटी व्यवहार सोबत बेटी व्यवहार आरंभ करून समाजातील अंतर ही दूर करावे. समाजाच्या संघटित होण्यामुळे आजची तरूण पिढी ही चुकीच्या पाऊल उचलण्यापासून  परावृत्त होऊन.समाजात कौटुंबिक, सामाजिक स्थिरता लाभेल. व कुरापती
करणाऱ्यांना मोठी चपराक बसेल.गत काळातील हेवे-दावे विसरून समाज संघटित व ऐक व्हावा असेही ते म्हणाले,या बैठकीतनगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी,माजी  नगराध्यक्ष राजुसिंग,बैठकीत नगर अध्यक्ष शिल्पाताई परदेशी, माजी नगरध्यक्ष राजुसिंह राजपूत, माजी शिवसेना प्रमुख सुशालसिंह राजपूत,राजपूत समाज अध्यक्ष जीवन राजपूत, विठ्ठलसिंह राजपूत, गोकुलसिंग राजपूत, दिनेश राजपूत, यांच्या सह वैजापूर शहर व तालुक्यातील मान्यवर,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परदेशी समाज बैठकीत धोंडीराम राजपूत यांनी संबोधित केले.
0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *