एक तास राष्ट्रवादीसाठी

Khozmaster
1 Min Read

महाराष्ट्राच्या आगामी * विकासासाठी….

चिखली:- (ता.०३)ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांच्या अभिनव संकल्पनेतून तसेच माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी *एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी* हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते यांच्या राहत्या घरी हा कार्यक्रम संपन्न झाला.आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचे पक्ष संघटन मजबुतीसाठी मनोगत व्यक्त करण्यात येऊन नागरीसमस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभाग क्र 1 चे नागरीक व राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखली विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटिल, शहर अध्यक्ष रविंद्र तोडकर, प्रदेश प्रतीनीधी शंतनु बोंद्रे, युवा प्रदेश सरचिटणीस शेखर बोंद्रे, नगरसेवक प्रशांत एकडे,युवक शहर अध्यक्ष सागर खरात, शहर उपाध्यक्ष प्रमोद चिंचोले, शेख युसुफभाई, युवा नेते शेख अनिस, निलेश जाटोळ, ओंकार तीडके, जावेद बागवान, यांच्यासह प्रभागातिल नागरीक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाई प्रशांत डोंगरदिवे तर आभार प्रदर्शन ओंकार तीडके यांनी केले.

0 9 4 5 5 6
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *