शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाचे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या सैनिकांचा हल्लासंपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांना धक्काबुक्की, छगन मेहेत्रे- संजय हाडे यांना मारहाण
बुलडाणा, 3 सप्टेंबर शिवसेना आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत् सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील बुलडाणाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली.
संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले की, हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते. यासंदर्भात अनेक व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, ज्यात कुणाल गायकवाड स्पष्ट दिसत आहेत. जवळपास 15 मिनिटे हा प्रकार चालला. पोलीस बघ्याची भूमिका घेऊन होते, असा आरोप शिवसेनेने केला आहे. खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली. लाथा बुक्क्या मारण्यात आल्या. संजय हाडे यांच्या पोटात लाथ घालण्यात आली. छगन मेहेत्रे यांनाही मारहाण झाली. घटने नंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. हल्ला करून शिंदे गटातील सैनिक निघून गेले.
बुलढाणा जिल्ह्यातील ठाकरे व शिंदे गट आपसात भिडले आहेत. राजकारणाची पातळी खालावली आहे मुद्द्यावरून गुद्दाची भाषा सुरू झाल्यामुळे आगामी काळात नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात राडे होऊन कायदा व सुव्यवस्थेची धिंड निघताना दिसणार आहे. राज्याप्रमाणे जिल्ह्याची सुद्धा राजकीय पातळी था पुढार्यांची मानसिकता विकृतीकडे वळत आहे. स्वार्थापोटी राजकीय पुढारी आपल्या परिभाषा बदलत आहे. पक्ष ,तत्व, निष्ठा याला तीळ मात्र किंमत उरलेली नाही अशा परिस्थितीत मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी सावध होणे निकडीचे आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वारसांकडे कोट्यावधी रुपयाची मालमत्ता आहे. तेव्हा त्यांना कोणत्याही गोष्टीची तमा बाळगायची आवश्यकता नाही परंतु अशा परिस्थितीत सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र कायदा व सुव्यवस्थेचा उल्लंघन करीत हकनाक आरोप घेऊन आरोपीचा किताब मिळवतो अनायासे याचा त्रास परिजन व आप्तिष्ठांना सोसावा लागतो याचा गंभीर विचार कार्यकर्त्यांनी करायला हवा. पुढार्यांची निष्ठा स्वार्थापोटी बदलते मग कार्यकर्तेच एकनिष्ठ कशाला हवे असा सूर जनतेत उमटत आहे.