विनय भंग ….
विनय भंग केला हो
अचानक हो तक्रार
तपासावे सत्य काय
कसा घडला प्रकार
कधीकधी खोटेपणा
ख-याचा घेईआधार
बडवत राहे ढोलकी
पुरावे जरी निराधार
सावज राहे बाजूला
तिसरा होतो शिकार
प्रसिद्ध होण्याकरता
वाढे प्रकार चिक्कार
खरा आवाज दबेल
कोण ऐकेल चित्कार
अन्याय हो कुणावर
कोण ऐकेलं फुत्कार
असल्या क्रूरकर्माचा
कधी ना हो सत्कार
खोटे नाटे आरोपांनी
काय होईल साकार
आला आला लांडगा
चालत राही झंकार
खरोखर संकट येता
मदतीला मिळे नकार
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६..