शांतिदूत सेवारत्न पुरस्काराणे पत्रकार सचिन बिद्री सन्मानित….

Khozmaster
1 Min Read
पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल..
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शांतिदूत परिवार महाराष्ट्रराज्यच्या वतीने साल 2022 च्या सेवा रत्न पुरस्कारांनी मान्यवरांच्या सन्मानित करण्यात आले,यामध्ये एन टी व्ही न्यूज मराठी व्रत्तवाहिनी व दै गुरुधर्मच्या माध्यमातून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेत, पत्रकार सचिन प्रकाशराव बिद्री यांनां शांतिदूत सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.रविवार दि.१३ नोव्हेंबर रोजी  मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात संपन्न झाला .यावेळी भाऊसाहेब बिराजदार बॕकेचे चेअरमन तथा रा.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जेष्ठ समाज सेवक डॉ.दामोदर पतंगे, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी .सभापती जितेंद्र शिंदे, उद्योजक एल टी मोरे, भारत शिक्षण संस्थेचे संचालक सुनिल माने,डॉ.सुभाष वाघमोडे, लातुरचे माजी महापौर सुरेश पवार ,म.राज्य अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक क्षीरसागर,शांतीदूत परिवाराचे मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरिक्षक विठ्ठल जाधव, अध्यक्षा विद्याताई जाधव आदी मान्यवर उपस्थीत होते.
युवकांमध्ये वाचन संस्कृती रुजविणारे ऍड शितल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, शिवमुर्ती भांडेकर,श्रीकृष्ण रक्तपेढीचे अभय कुमार हिरास,अभिजीत जाधव,जि प शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, प्रदीप चालुक्य,प्रा.डॉ. विष्णु शिंदे,दै लोकमत चे पत्रकार प्रा. गुणवंत जाधवर,एन टी व्ही व्रत्तवाहिनीचे विभागीय प्रतिनिधी तथा दै गुरुधर्मचे सचिन प्रकाशराव बिद्री,उद्योजक विरभद्र स्वामी,प्रा.शिवाजीराव वडणे,झी चोवीसतास चे प्रतिनिधी ज्ञानेश्वर
पतंगे आदींना मान्यवरांच्या हस्थे पुरस्कार प्रदान करीत गौरविण्यात आले.
0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *