सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील परिसरात कापूस चोरीला गेल्याची सत्र सुरूच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून एकाच शिवारातून मध्यरात्रीच्या सुमारास देऊळगाव गुजरी येथील शेतकरी संतोष मानसिंग राठोड गट क्र. ३४ रेणुकाबाई गणेश राठोड गट क्र ६६ तर सुशिलाबाई मधुकर जटाळे गट क्र ६१ आशा या तीन शेतकरी मिळून किमान अंदाजे सात ते आठ क्विंटल कापूस चोरीला गेल्याचे प्रकार लक्षात येताच, शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेतली व पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या आ. पो. फत्तेपूर पोलीस स्टेशनला हा सर्व प्रकार लक्षात घेऊन आ..पो. फत्तेपूर येथील पो. हे. कॉ. प्रवीण चौधरी व जिजाबराव कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदरील चोरी गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यात आले. शेतकरी संतोष राठोड यांनी पोलीस प्रशासनाला श्वानपथक ची मागणी केली. एकीकडे आसमानी संकटाचे निवारण झाले तर दुसरीकडे भुरट्या चोरांचा धुमाकूळ वाढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिसकावल्याने देऊळगाव गुजरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे भितीचे वातावरण पसरले आहे.
Users Today : 12