सोयगाव डोंगरी भागातील नोकर भरतीत वयाच्या अटतीत सुट देण्याची;सुनील माकोंडे यांची मागणी प्रतिनिधी….

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
 सोयगाव तालुका शंभर टक्के डोंगरी भाग असल्याने विविध सुविधांपासून कोसो दूर असून युवक बेरोजगार आहेत. शासनाने डोंगरी भागासाठी विविध विभागाच्या जागा भरताना सोयगाव तालुक्यासाठी युवकांना वयाची अट शिथिल करून पाच टक्के जागा राखीव करण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष सुनील माकोडे सावळदबारा यांनी एका निवेदनाद्वारे सोयगाव तहसीलदारांकडे केली आहे. सोयगाव तालुक्याचा निजाम काळापासून विकास झालेला नाही. शासनाच्या विविध योजना उशिरा पोहोचत असल्याने येथील युवक शिक्षण घेऊन बेरोजगार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रहीमखाँन पठाण, सुनील चोरमारे, मो.आशपाक मो.इशा,सागर जैस्वाल, दिपक गावडे, राहुल टिकारे, सुरज ठाकूर, पवन कुल्ले,शुभंम पुजारी, विलास रावळकर,गणेश महाजन यांच्या सह्या आहेत.या निवेदनाच्या प्रति तहसीलदार सोयगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, कृषिमंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना पाठवण्यात आल्या आहेत.
0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *