औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
चिखलठाणा लायन्स आय हॉस्पिटल व भगवान महावीर रुग्णालय नगर परिषद वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार(ता,१४)रोजी भगवान महावीर रुग्णालयात नेत्र सेवा आपल्या दारी अंतर्गत
डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले, या शिबिरात ८२रुग्णांची तपासणी करण्यात आली यात ३१रुग्ण मोती बिंदू शस्त्रक्रिया साठी निघाले यांच्या डोळ्याचे औरंगाबाद येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहे,असे
प्रकल्प समन्वयक विनोद हरकुटे यांनी सांगितले, सदर
नेत्र तपासणी शिबीर आता यापुढे दर सोमवारी सकाळी१०-३०ते दुपार २-०० पर्यत दर आठवड्याला राहणार आहे,या शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी,उपाध्यक्ष साबरखान,व मुख्याधिकारी भागवत बिघोत व नगरसेवक यांच्या उपस्थितीत झाले,स्वच्छता दूत धोंडीरामसिंह राजपूत,वैद्यकीय अधिकारी डॉ,सविता निकाळे, सहाय्यक अशोक गाडेकर,परिचारिका सहाय्यक संगीता सिरसाट, तसेच चेतन निखाडे,गणेश निकम,लखन गाडेकर यांनी शिबीर यशस्वीतेसाठी
सहकार्य केले,नेत्र तपासणीक उत्कर्षा वैद्य,अक्षय ढाकरे,सविता शेजवळ यांनी रुग्ण तपासले, शेवटी डी,डी,ठाकूर यांनी आभार मानले,(फोटो कॅप्शन -नेत्रसेवा आपल्या दारी अंतर्गत रुग्णालयात नेत्र तपासणी पथक सोबत विनोद हरकूट,धोंडीराम राजपूत, डॉ,निकाळे, अशोक गाडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 12