बियाणे साठवणुक करतांना घ्यावयाची काळजी विषयी सोयगाव कृषी विभागाचे आवाहन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी पश्चात व बियाणे साठवणूकीत बियाण्याची काळजी घ्यावी अशे सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांनी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. खरीप २०२३ मध्ये सोयाबीन बियाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी खरीप २०२२ मध्ये राज्यात व्यापक प्रमाणात घरचे सोयाबीन बियाणे मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन काढणीच्या काळात झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे खरीप २०२३ मध्ये सार्वजनिक व खाजगी क्षेत्रामार्फत बियाणे विक्री केंद्रावर उपलब्ध होणाऱ्या प्रमाणित सोयाबीन बियाण्याचे प्रमाण कमी असणार आहे. त्यासाठी उत्पादीत झालेल्या सोयाबीन बियाणेची योग्य पद्धतीने साठवणूक करणे आवश्यक आहे, जेणेकरून सदर बियाणे खरीप २०२३ करीता पेरणीसाठी उपलब्ध होईल. याअनुषंगाने स्थानिक पातळीवर शेतकरी बांधवांमध्ये सोयाबीनची कापणी पश्चात व बियाणे साठवणूकी संदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत जागृती करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत खरीप २०२३ करीता बीजोत्पादनासाठी उत्पादित होणाऱ्या सोयाबीन बियाण्याची शेतक-यांनी विशेष काळजी घ्यावी;कृषी सहाय्यक मानसिंग भोळे यांनी बोलताना सांगितले.
बिजोत्पादक शेतक-यांनी सोयाबीनची कापणी पश्चात घ्यावयाची काळजी घ्यावी सोयाबीन बियाणे वाळविताना त्याचा मोठा ढीग न करता पातळ थरावर पाळवावे, जेणेकरून बियाण्यामध्ये असलेल्या आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही व बियाण्याचे गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. बियाणे मळणी केल्यानंतर सरळ पोत्यामध्ये न भरता तत्पूर्वी दोन ते तीन दिवस ताडपत्रीवर किंवा स्वच्छ तयार करून सावलीमध्ये वाळवावे. यादरम्यान बियाण्यावर हात फिरवून फेरपालट करावी. बियाणे वाळल्यानंतर बियाणे चाळणीद्वारे गाळणी करून बियाण्यात काडीकचरा व मातीचे खडे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.वाळलेले व स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्युट बारदानामध्ये भरावे. पोत्यामध्ये साधारणपणे ६० किलोपर्यंत बियाणे साठवावे. त्यापेक्षा अधिक बियाणे साठवणूक करण्यात येऊ नये. जेणेकरून बियाण्याची वाहतूक करताना हाताळणी योग्य प्रकारे होऊन बियाण्यास इजा होणार नाही. बियाणे घरी साठवणूक करतेवेळी सोयाबीन विद्याण्याची थप्पी ७ पोत्यांपेक्षा उंच जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बियाणे साठवणूक ही दमट व ओलसर जागेच्या ठिकाणी करू नये. बियाणे साठवणूक करण्यापूर्वी जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळ्या किंवा जुने पोते इ. अंथरून त्यावर बियाण्याची साठवण करावी.उपरोक्त प्रमाणे सोयाबीनची कापणी पश्चात व बियाणे साठवणूकीची काळजीबाबत क्षेत्रीयस्तरावर सोयगाव कृषी विभाग यांच्या वतीने
अशे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ सोयगाव यांनी केले आहे.
Users Today : 12