मावस बहिणीवर जडले प्रेम अन् प्रेमीयुगुलाची रेल्वे खाली आत्महत्या!

Khozmaster
1 Min Read

देवेंद्र सिरसाट,नागपूर.नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसखाली प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खापरी येथील रेल्वे लाईन वर घडली.एकमेकांवरील प्रेमात नातं आड आले आणि प्रेमाचा भयानक शेवट झाला. प्रेमीयुगुलाने नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत खापरी येथील रेल्वे रुळावर घडली आहे. दोघांचीही ओळख पटली असून पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत सविस्तर वृत्त असे की,जितेंद्र नेवारे याचे लग्न झाले होतं. तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा. जितेंद्र ची बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. बायको माहेरी गेल्यानंतर तो आईसोबत एकटाच राहायचा. व जिंतेद्र ची मावस बहिणीचे जिंतेद्र च्या घरी अधुनमधून येणे जाणे सुरू झाले होते.व दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघांनीही लग्न करायचा विचार कलेला होते. पण नातेवाईक आणि समाज आपला स्वीकारणार करनार नाही या कारणांमुळे टोकाचा निर्णय घेतला.

पोलिसांच्या माहिती नुसार, जितेंद्र आपल्या मावस बहिणीला भेटायला गोंदियाला गेला.त्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी नागपूरला आली. दोघांनी दिवसभर एकमेकांसोबत वेळ घालवला. त्यानंतर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह रेल्वेच्या रुळावर आढळून आले.त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

पोलिसांना घटनास्थळावरून तुटलेले फोन मिळाले आहेत. 

या फोनची पूर्ण तपासणी सायबरसेलच्या मदतीने केली आसताना हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। याबाबत हिंगना पोलिस पुढील तपास करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *