शेतकऱ्यांमध्ये पाऊसामुळे दिलासादायक वातावरण…..
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात डाभा, नादातांडा, देव्हारी,मोलखेडा, टिटवी, घाणेगांव ताडां,सावळदबारासह पावसाने १ सप्टेंबर रोजी हजरी लावली या पावसाने वीस दिवसांचा खंड दिल्यानंतर गुरुवारी सावळदबारा परिसरात व दिलासादायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले होते सावळदबारा व परिसरात खरिपाचे जुलै सोयाबीन, मका, मुग,ज्वारी व कपाशीसह इतर पिके जोमात होते मात्र अगस्ट महिण्यात तब्बल पावसाचा वीस दिवसांचा खंड पडल्याने पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली होती तसेच रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत होता पिके उन्हामुळे शेतकऱ्याच्या हातून जाण्याच्या मार्गावर होती ,यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले होते मात्र गुरुवारी रात्री सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातारावर निर्माण झाले होते तसेच शेतीपिकांचे पावसाअभावी थांबलेल्या पुढील कामाच्या मशागतीस शेतकरी पुन्हा जोमात सुरुवात करणार असल्याचे चित्र सावळदबारा परिसरात निर्माण झाले आहे.
▪️पाऊस दिलासा दायक झाल्याने शेतकरी फवारणी कामाला जोमात लागले आहे. नाहीतर शेतीपिकाचे पावसा अभावी शेतकरी थांबले होते. आता मात्र सोयाबीन, मका, कपाशी या पिकाच्या फवारणीच्या कामांना वेग आला आहे.
राज रामराज ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते)तथा सिध्दीविनायक कृषी सेवा केंद्र देवळगांव गुजरी
Users Today : 21