रिपब्लिकन सेनेमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश

Khozmaster
2 Min Read

बहुजनांचे उदय सम्राट आनंदराज आंबेडकर साहेब व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब यांच्या आदेशाने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा महासचिव सलीमभाई यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे यांच्यावर विश्वास ठेवून बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचे रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला व कार्यकर्त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच गोरगरिबांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन सेनाही तत्पर सेवा देत असून आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागासवर्गीयांवर झालेले अन्याय अत्याचार बलात्कार पीढित कुटुंबाच्या मदतीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील कोणताही आमदार खासदारांनी व पंचायत समिती सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी लोकप्रतिनिधी पीढित कुटुंबांना साधी भेट देऊन पीडित कुटुंबाच सांत्वन सुद्धा केले नसून मागासवर्गीयांचा आजपर्यंत फक्त मतदानापुरताच वापर केला जात असून यापुढे मागासवर्गीयांने अस्या आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांना व लोकप्रतिनिधींना येणारा निवडणुकीमध्ये त्यांना त्याची जागा दाखवण्याचे काम सर्व समाज बांधवांनी करावे व जो नेता बुलढाणा जिल्ह्यातील अन्याय अत्याचार बलात्कार झालेल्या कुटुंबांच्या मदतीला धावून जात असेल व त्यांचे सात्वन करित असेल व निवेदनाच्या माध्यमातून पीढित कुटुंबाची मदत करत असेल अशा नेत्यांना मतदानाच्या माध्यमातून आपण त्यांना मतदान करून आपला प्रतिनिधी निवडून देण्याचे काम आपण केले पाहिजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अन्यायग्रस्त कुटुंबांना कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मदत केली नाही व होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये गोरगरीब जनतेने अशा लोकप्रतिनिधींना धडा शिकविल्याशिवाय राहू नये असे जाहीर आव्हान रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी बैठकीदरम्यान केले. या बैठकीमध्ये चिखली तालुका अध्यक्ष श्याम लहाने, युवा जिल्हाध्यक्ष लखन कुसळकर, शहराध्यक्ष सुनील सोळंके, युवा शहराध्यक्ष शेख मलिक, उपाध्यक्ष रमेश आंभोरे, उपाध्यक्ष अन्सारभाई, कार्याध्यक्ष सतीश इंगळे, ता.उपाध्यक्ष वसीम भाई, जावेदभाई, सौरभ बावस्कर, ऋषी हिवाळे, अमोल शिराळे, सुरज गायकवाड, नितीन वानखेडे, सुरज कांबळे, रोहित गाडे, गणेश गुंड, सागर माडुकर, विशाल शिराळे, आनंद वरडकर, ऋषी गवारे, रोहन गवई, अभिजीत दाभाडे, प्रशांत वाकोडे, आमीन शेख अत्तार, रोहन घेवंदे, वैभव यंगड, प्रशांत साळवे, निखिल वाकोडे, दशरथ गायकवाड, रितेश पैठणे, यश बावस्कर, संजय मोहिते, सुरज कांबळे, शुभम निकाळजे रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 8 9 4 7 0
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *