चार दिवसीय उर्दू कार्यपुस्तिका निर्मिती कार्यशाळा संपन्न

Khozmaster
3 Min Read
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
उर्दू भाषा विभागा मार्फत लर्निंग इन्हासमेंट प्रोग्राम
बार्शीटाकली,
उर्दू भाषा विभाग महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत चार दिवसीय उर्दू भाषा कार्यपुस्तिका निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेसाठी मा एम डी सिंह साहेब भा प्र से संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे रमाकांत काठमोरे साहेब सह संचालक डॉ कमलादेवी आवटे उपसंचालक भाषा विभाग अरुण सांगोलकर उपविभाग प्रमुख तवसिफ परवेज सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले दिनांक 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022 या कालावधीत उर्दू भाषा विभाग मार्फत संपूर्ण राज्यातील उर्दू माध्यमातील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती वर आधारित कृतीपुस्तिका निर्मिती कार्यशाळा महात्मा फुले हॉल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे येथे संपन्न झाली या कार्यशाळात राज्यातील 27 तज्ञांची उपस्थिती होती तसेच
श्री तवसिफ परवेज एम मुजफ्फर यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली व संपूर्ण राज्यातील इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सहजरीत्या कार्यपुस्तिका उपलब्ध करून देता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले कार्यपुस्तिका तयार करण्यासाठी इयत्ता सहावी इयत्ता सातवी इयत्ता आठवी अशाप्रकारे तीन वेगवेगळे ग्रुप तयार करून कार्यपुस्तिकाचे कार्य करून घेण्यात आले या प्रकारे तीन दिवसीय कार्यपुस्तिक निर्मिती कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल वरिष्ठांनी समाधान व्यक्त केले,या वेळी महाराष्ट्र राज्यातील तज्ञा मध्ये मोहम्मद इक्बाल सिद्दिकी जि प शाळा अंजी ता जि वर्धा तारिक अस्लम मालेगाव शाहिद इक्बाल खान सरफराज खान जि प उर्दू शाळा महान बार्शीटाकली जि अकोला शेख शागिर्द अहेमद गुलशने अतफाल उर्दू शाळा उस्मानाबाद मो रिजवान अब्दुल रहीम  सय्यद सलाउद्दीन सय्यद हकीमद्दिन डॉक्टर शेख नबील डॉ मुबाशशीर इब्राहिम जमदार अब्दुल मोहसीन अब्दुल मुनाफ जिल्हा परिषद उर्दू शाळा वाकळी ता जामनेर जि जळगाव अब्दुल्ला जिया अहमद शबाना जकीउद्दीन सिद्दिकी सुममया अब्दुल रशीद समीना नजीर खलिफा  सबिहा एस ए शेख खान कुरातुल ऐन जिनत अय्युब शेख मो सलीम उस्मानी मन्सूर अखतर मो सलीम अब्रार आलम मो अन्वर शेख गुलाम हुसेन शबनम उस्मान पीर खान शेख फय्याझोद्दीन हुसेन डॉ मोहम्मद राफे मोहम्मद कमालोद्दीन जावेद अहेमद काजी माहेमुद नवाज राज्यातील उपरोक्त तज्ञांची सदर कार्यशाळाला उपस्थिती होती
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे सदर शैक्षणिक नुकसान भरून काढण्याकरिता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने प्रत्येक वर्गा साठी विशेष कृती पुस्तक तयार करण्यात येत आहे सदर पुस्तकाचे लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच होणार पुणे येथे संपन्न झालेल्या सदर कार्यशाळा साठी प्रत्येक जिल्ह्यातून एक एक उर्दू शिक्षकांची नियुक्ती करण्यात आले होते यामध्ये अकोला जिल्ह्यातून महान जिल्हा परिषद शाळेचे अध्यापक शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांची निवड करण्यात आली होती सदर कार्यपुस्तिका विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे
0 8 9 4 7 0
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *