आरोपी कडून 22 किलो गोमांस सह 5,000/-रुपये मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसूर)
दिनांक.04, 09,22, रोजी चे सकाळी नऊ ते दहा वा
चान्नी पोलिस ठाणे येथील ग्राम पो.हे.कॅ 1636 बाळू येवले त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खत्रीलायक माहिती मिळाली की ग्राम तुलंगा गावात शेख ईमाम शेख. कासम कुरेशी रा. वाडेगाव हा जमिनीवर गोवंश मांस चे दुकान मांडून गोवंश मांसची विक्री करत आहे. अश्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकसह सदर ठिकाणी जावून छापा कारवाई केली असता, ग्राम तुलंगा येथे शेख ईमाम शेख. कासम कुरेशी रा. वाडेगाव हा गोवंश मांस विक्री करतांना दिसुन आला आरोपी ला जागेवर पकडून त्याच्याकडून 22 किलो गोमांस व साहित्यसह 5,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन चान्नी येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला.
Users Today : 21