देऊळगाव घुबे येथील शेतकरी संघटनेचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न

Khozmaster
2 Min Read
माझा शेतकरी हा भीक वाढणार्याची औलाद आहे मागणार्याची नाही           
चिखली मेघा जाधव
लक्ष्मणराव वडले
देऊळगाव घुबे ता.चिखली :- शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा देऊळगाव घुबे येथे अतीशय उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात उपस्थित झालेले शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव वडले व प्रशिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव ढख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात बोलतांना वडले म्हणाले शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून शरद जोशींनी शेतकरी चळवळ उभी संघटना स्थापन केली.भारत हा कृषीप्रधान देश आहे.भारतीय अर्थ व्यवस्थेत शेतीचे स्थान अनन्यसाधारण आहे.शेती आजही एक प्रमुख व्यवसाय आहे.भारतीय लोकसंख्येतील 64%जनता ही आजही शेती व्यवसायांवर अवलंबून आहे.व त्यातील 70%शेतकरी अल्पभूधारक आहेत.त्यामुळे शेतकरी हा अर्थव्यवस्थेतील एक मुलभूत घटक आहे.म्हणुन‌ त्याचे स्वास्थ्य व हित जपणारी संघटना की एक काळाची गरज ठरली.व *शेतकरी हा भीक वाढणार्याची औलाद आहे भीक मागणार्याची नाही* परंतु आजच्या शेतकऱ्यांना मोदी शाही धोरण अतीशय मारक ठरत आहे. सव्वा भावाने व दुकानदार ठरवेल
या कार्यक्रमात ज्यांना ऐकण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात‌ व बहुसंख्येने आले होते ते प्रशीद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करावा व शेतीत निसर्गाचा कशा पद्धतीने परिणाम होतो व कुठल्या वेळी कशा पद्धतीचे बदल केल्या पाहिजे या संदर्भात शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळे अण्णा सोशल फाउंडेशनचे प्रवर्तक रमेश अण्णा मुळे हे होते.तर मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणराव वडले विदर्भ जनआंदोलन समितीचे वाशीम जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव घाडगे,स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान कनखर, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेशसींग चव्हाण,एकनाथ पाटील थुट्टे,ॲड शर्वरी तुपकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास पाटील,चिखली पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ.उषाताई थुट्टै,व जिल्हास्तरीय शेतकरी संघटनेचे तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्ताविक मा. उपसभापती भानुदास घुबे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर खरात यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स गावातील सर्व तरुणांनी मेहनत घेतली गावकऱ्यांच्या आर्थिक मदतीतून भोजनाची व्यवस्था करण्यात आली . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले
0 8 9 4 7 0
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *