सतिश मवाळ
मेहकर विविध सामाजिक उपक्रमाची परंपरा जपणारे मंडळ म्हणून देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील श्री मारुती गणेश मित्र मंडळ यांची ओळख आहे. या मंडळाला 22 वर्षे पूर्ण झाली असून दरवर्षी मंडळाकडून नाविन्यपूर्ण व सामाजिक संदेश तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे. सामाजिक उत्तरदायित्रीचे भावनेतून या मंडळातर्फे विविध उपक्रम घेण्यात येतात.
अशाच प्रकारे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून 4 सप्टेंबर वार रविवारला श्री.मारोती गणेश मित्र मंडळ व डॉ. विशाल मगर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य अशा मोफत आरोग्य रोग निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी डॉ.विजयकुमार गिऱ्हे मुखरोगतज्ञ,MDS
डॉ.विशाल सुरुशे बालरोग तज्ञ,डॉ.अनंता मगर जनरल सर्जन, सर्जन लॅप्रोस्कॉपिक सर्जन.डॉ.विशाल मगर, छाती रोग मधुमेह हृदयरोग व क्रिटिकल केअर तज्ञ,डॉ.प्राची गिऱ्हे MDS,डॉ.अरुण गिऱ्हे नेत्ररोग तज्ञ,डॉ.सुनील सुलताने वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी,डॉ.सचिन सानप जनरल फिजिशियन,डॉ.डी.व्ही. सुरुशे जनरल फिजिशियन,डॉ.प्रवीण गाभणे जनरल फिजिशियन,डॉ.गजानन गीऱ्हे जनरल फिजिशियन,डॉ. रवी जमदाडे जनरल फिजिशियन, डॉ.शिवशंकर बळी,डॉ.बद्री मगर,
डॉ. मधुसूदन राऊत,डॉ.जयराम मगर,डॉ.राम जमधाडे लघवी रक्त तपासणी या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांवर तपासणी करून औषधोपचार केले. जवळपास या शिबिराचा 730 हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. यासारख्या विविध उपक्रमाची परंपरा मंडळकडून जपली जात आहे.यावेळी मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर रिंढे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या मोफत औषधोपचार व रोग निदान शिबिरासाठी वैभव इंगळे, आकाश राऊत, पवन कंकाळ, राम खरात, मंगेश सोनवणे,शिवाजी मगर, विनोद मगर, माधव बळी, अभिमन्यू मगर, नरेंद्र गीऱ्हे, समाधान मगर,राहुल मगर या फार्मासिस्ट मंडळींचे खूप मोलाच सहकार्य लाभले.तसेच श्री.पांडुरंग संस्थांनचे कार्यकारी मंडळ, समस्त गावकरी तसेच गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सामाजिक दायित्वाची परंपरा जपणारे श्री मारोती गणेश मंडळ
0
9
4
5
5
6
Users Today : 21
Leave a comment