श्री . गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच गणपती उत्सव , गौरी पुजन अशा सुरु असलेल्या उत्सवांमध्ये महिलांना विविध धार्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले करण्यात आले. त्याचबरोबर महिला आदर गृह वृद्धाश्रम व घरकुल कॉलनी मध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आले. स्थानिक मुर्तिजापुर शहरातील श्री . गजानन महाराज भक्त परिवारा कडून दरसाल श्री . गजानन महाराजांच्या प्रगटदिना निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते . त्याच बरोबर विविध प्रकारचे धार्मिक पुस्तके जसे श्री . गजानन बावन्नी , हनुमान चालीसा , श्री स्वामी समर्थ , माता पिता प्रेम , आरती संग्रह व इतर अशा धार्मिक साहित्याचे निशुल्क वाटप करण्यात येते . आज पावेतो श्री . गजानन बावन्नी च्या ४ लक्ष प्रति , हनुमान चालीसा , श्री . स्वामी समर्थ , माता पिता प्रेम , आरती संग्रह व इतर साहित्यांच्या २००० ते ३००० प्रति वाटप करण्यात आल्या आहेत . दरवर्षी प्रमाणे यंदा श्री . गजानन महाराज भक्त परिवारा कडून नित्यस्मरण या पुस्तिका छापण्यात आल्या . या पुस्तिका छापण्या करण्याकरिता श्री . च्या भक्तांनी मनोभावे सहकार्य केले . पुस्तिका वाटप करण्याकरिता श्री . गजानन महाराज भक्त परिवारातील भक्तगण व महिलामंडळाने मनोभावे सेवा केली . हया धार्मिक पुस्तिका श्री . चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्यांक बहु विकास संस्थे कडून उपलब्ध करुन देण्यात आल्या ..
Users Today : 36