शिक्षकांपेक्षा विद्यार्थी ठरले सरस

Khozmaster
1 Min Read

मेहकर:- स्थानिक महेश विद्यामंदिर मध्ये शिक्षक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी दिनांक 5/9/2022 रोज सोमवार ला शाळेची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांनी अतिशय योग्यरीत्या पार पाडली. यामध्ये इयत्ता दहावीचे विद्यार्थी हर्षराज मोदानी व श्रीश सदावर्ते यांनी अतिशय योग्य प्रकारे नियोजन करून, तासिका घेताना कुठलाही गोंधळ होणार नाही याची खबरदारी घेतली. यामध्ये इयत्ता दहावी, नववी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. शिक्षकांची भूमिका पार पाडत असताना अतिशय योग्य प्रकारे या सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित रित्या मुलांना शाळेमध्ये शिकवले. शाळेचे नियोजन अतिशय योग्य होते. कुठल्याही प्रकारचा गोंधळ शाळेमध्ये दिसून येत नव्हता. अतिशय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांनी एक दिवस आपली शाळा चालवली. शाळेच्या प्राचार्या सौ ज्योती मंत्री मॅडम उपप्राचार्य श्री गायकवाड सर, श्री टाक सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्री हाडे सर, श्री बीजेवार सर, श्री सावजी सर व इतर सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली शाळेचे अध्यक्ष श्री सुभाषजी लोहिया सर, सचिव गोपाल भाऊ मोदानी, उदय भाऊ सोनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

0 9 4 5 5 6
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *