मध्य प्रदेश राज्यातील 6 वर्षीय अल्पवयीन बालकाची स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीसांनी केली सुटका

Khozmaster
5 Min Read
प्रतिनिधी 
प्रविण चव्हाण
  नंदुरबार -:मध्य प्रदेश राज्यातील 6 वर्षीय अल्पवयीन बालकाची स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीसांनी केली सुटका,,,,
          सविस्तर माहिती अशी की,
  50 हजार रुपयात विक्री केलेल्या मध्य प्रदेश राज्यातील 6 वर्षीय अल्पवयीन बालकाची स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीसांनी केली सुटका,
    याबाबत सविस्तर माहिती अशी  की, दि. 04 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , मध्य प्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील एका 06 वर्षीय अल्पयीन बालकाला नंदुरबार शहरातील एका मेढपाळ व्यावसायीकाला 50 हजार रुपयात मजूरी साठी विक्री करण्यात आली आहे . मिळालेल्या माहिती मधील प्रकार हा अत्यंत गंभीर होता .
   घटने चे गांभीर्य लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली 04 वेगवेगळे पथक तयार करुन मेंढपाळ व्यावसायीकाचा व अल्पवयीन बालकाचा शोध घेवून आरोपीतांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले . दिनांक 04 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर तसेच नंदुरबार पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांचे पथकांनी मेंढपाळ व्यावसायीकाचा व अल्पवयीन बालकाचा नंदुरबार शहरात व शहरा बाहेर परराज्यातील व जिल्ह्यातील असलेल्या उत्तारुंचा शोध घेतला परंतु उपयुक्त अशी काही एक माहिती मिळून येत नव्हती . सायंकाळच्या सुमारास नंदुरबार शहरातील उप प्रादेशीक परिवहन कार्यालयासमोर असलेल्या कोळसा डेपो जवळ काही मेंढपाळ असून त्यांच्या सोबत एक अल्पवयीन बालक देखील आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर ,
   नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांनी त्यांचे पथकासह तात्काळ कोळसा डेपो जवळ धाव घेतली . एक बालक काही मेंढयांना चारा घालत असतांना दिसून आल्याने पोलीसांनी त्यास जवळ घेवून विचारपूस केली त्यावेळेस त्या अल्पवयीन बालकाने सांगितले की , तो मुळचा मध्य प्रदेश राज्यातील राहणारा असून त्याचा नातेवाईक  मारुती याने त्यास ठेलारी कडे मेंढ्या चारण्यासाठी दिलेले आहे . त्यावरून मेंढपाळ  गुंडा नागो ठेलारी वय -45 रा . भोणे ता.जि. नंदुरबार यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने अतिशय धक्कादायक माहिती दिली . मारोती सोवकर रा . गारवर्डी ता . जि . बऱ्हाणपूर  मध्य प्रदेश या इसमाने 50 हजार रुपये घेवून खातला फाटा ता . जि . बऱ्हाणपूर येथील त्याच्या नातेवाईकाचा अल्पवयीन मुलाला मेंढया चारण्यासाठी दिलेले आहे . त्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक मध्य प्रदेश राज्यातील बहाणपूर जिल्ह्यात रवाना केले . पोलीसांच्या पथकाने गारवर्डी जि . बताणपूर मध्य प्रदेश येथून मारोती रामा सोनकर वय -20 रा . गारवडी ता.जि. बहाणपूर मध्य प्रदेश यास ताब्यात घेवून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले . त्याचे कडे चौकशी केली असता त्याने सदर मुलास 50,000 / – रुपयांत मेंढपाळ व्यवसायीकाला दिले असल्याचे कबुल केले असून त्यास अटक करणेची प्रक्रीया सुरु आहे . 06 वर्षीय अल्पवयीन बालकाला बाल कल्याण मंडळा समोर हजर करुन त्याचे पुर्नवसन करण्यात आले असून अल्पवयीन बालकास त्याच्या आई – वडीलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे .
   आरोपीत नामे  गुंडा नागो ठेलारी बय -45 रा . भोणे ता.जि. नंदुरबार, मारोती रामा सोनकर वय -20 रा . गारवडी ता . जि . बहाणपूर मध्य प्रदेश यांचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 570/2022 भा.द.वि. कलम 370 ( 4 ) , 374 सह बाल कामगार अधिनियम 13.14 व बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 75.79 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ह आरोपीताना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ताब्यात घेतले .
     सदर ची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ,  पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक  विजय पवार , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर ,
    शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , सहा . पोलीस निरीक्षक नंदा पाटील , पोलीस उप निरीक्षक प्रवीण पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अमंलदार यांनी केलेली आहे .
    तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे .
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अल्पवयीन बालकांची कोणतीही वेठबिगारी बाबत माहिती मिळाल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष , नंदुरबार 02564-210100 / 210113 येथे संपर्क साधावा .
पी . आर . पाटील,
 नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक…
0 8 9 4 7 0
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *