ज्ञानदाना सोबत विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचे कार्य शिक्षक करीत असतात

Khozmaster
3 Min Read
चिखली : गुरूर्ब्रम्हा गुरुर विष्णू गूरुर देवो महेश्वरा
गुरू हा साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
साक्षात परब्रम्ह जर कोणी असेल तर तो शिक्षक आहे
भारतीय परंपरेतील “गुरू शिष्य “ही भारताने जगाला दिलेली महान परंपरा आहे.
           हजारो वर्षांपासून आपण गुरू शिष्य नात्याला वृध्दींगत करणारी गुरू पौर्णिमा साजरी करतो.
           आधुनिक भारतात आपण याच परंपरेला पूरक असणारी उत्सव शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.
           भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्म दिवस आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो. डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञ होते. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्याच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधीशी त्याचे सबंध होते. सर्वेपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्त्वज्ञान प्रसिद्ध होती.
       त्यांना संविधानसभेचे सदस्य होण्यासाठी पाचरण केले. त्यांना तत्त्वज्ञान मार्गदर्शनाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापुर्वी काही वर्ष ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापींठाचे ते कुलगुरू होते. प्रशासन त्यांनी यशस्वीपणे सांभाळले होते. विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारा मार्गदर्शक म्हणजे शिक्षक . प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही गुण असतातच . बौद्धिक क्षमता ही विद्यार्थ्यांनुरुप बदलत असते त्या बौद्धिक क्षमतेला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला पंख आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही परंतु या पंखांना उडण्याची शक्ती देण्याचे काम शिक्षक गुरु देत असतो असे प्रतिपादन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी शिक्षक दिनी शिक्षकांच्या झालेल्या सत्कार सोहळ्या दरम्यान केले .
*चिखली विधानसभा मतदार संघातील जी प शाळांचा विकासाचा कृती आराखडा तयार करणार*       प्रत्येक
        गावातील नागरिक लोकप्रतिनिधींकडे विविध समस्या घेऊन येतात व त्यासाठी निधीची मागणी करतात परंतु दुर्दैवाने त्यामध्ये शाळांच्या विकासाच्या समस्यांचा समावेश नसतो . परंतू मी स्वतः  लक्ष घालून चिखली विधानसभा मतदारसंघातील जि प शाळांच्या विकासाचा कृती आराखडा तयार करणार असून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये तो पूर्णपणे त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविले
        दिनांक 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त चिखली पंचायत समिती अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला . यावेळी चिखली तालुक्यातील 35 शिक्षक व शिक्षकेचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आ सौ श्वेता ताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर डी शिंदे यांनी केले
गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे
पंडीत दादा देशमुख शहरध्यक्ष, प्रविण वायाळ, अरुण पाटील, लक्ष्मण राव शेळके, गणेश भगत, पी एम सपकाळ केंद्रं प्रमुख यांची उपस्थिती होती .
सूत्रसंचालन उर्मिला शेळके यांनी केले.
0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *