शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असतो:- आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे

Khozmaster
3 Min Read
राष्ट्रवादी काँग्रेस देऊळगाव राजा यांच्या वतीने उत्कृष्ट बैल जोडी निवड कार्यक्रम संपन्न..
देऊळगाव राजा/(शब्दनायक):- शेतकऱ्यासोबत बैल शेतात वर्षभर राबराब राबतो.शेतात पिकवलेल्या प्रत्येक दाण्यांमध्ये त्याचाही वाटा असतो. धन्यासोबत त्याचे संबंध म्हणजे जीवाभावाचे. घरातील एका सदस्यासारखे. बैलही या संबंधाला तडा जाऊ देत नाही.अश्या शेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष उद्धव म्हस्के यांच्या मार्गदर्शना खाली उत्कृष्ट बैल जोडी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त बोलतांना ‘राष्ट्रवादी पक्ष हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करत असतो त्यामुळे पशुधना बद्दल ची आपुलकी, प्रेम व्यक्त करण्यासाठी सबंध महाराष्ट्र भर उत्कृष्ट बैल जोडी निवड कार्यक्रम राबविण्यात आले असे प्रतिपादन माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा सिंदखेड राजा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले.यानिमित्त पक्षाचे प्रांतध्यक्ष जयंतराव पाटील आणि बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांच्या सुचनेनुसार तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दि.५ सप्टेंबर रोजी उत्कृष्ट बैलजोडी निवड व सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगण तथा प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी होते. याप्रसंगी संतोष पाटील, राजेन्द्र डोईफोडे, सिताराम चौधरी, संतोष खांडेभराड, प्रा.दिलीपकुमार झोटे, हरीश शेटे, गजानन पवार, अ‍ॅड.अर्पित मिनासे, एल.एम.शिंगणे, रंगनाथराव कोल्हे, सरस्वती टेकाळे, मंदा शिंगणे, रेखा पवार, नितिन शिंगणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उद्धव म्हस्के यांनी उपस्थिती जनसमुदाय समोर कार्यक्रमाची रुपरेशा मांडली. याप्रसंगी तालुक्यातील ६० गावातील मुक्या सहकायार्ची निगा करणाऱ्या बळीराजाचा सन्मान व सत्कार शाल, टोपी, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच राष्ट्रवादी युवक निर्वाचित पदाधिकारी प्रमोद घोंगे,आदिल पठाण,अरविंद खांदेभराड, यांचा सत्कार तसेच वाईस ऑफ मिडीयाचे जिल्हा उपाध्यक्ष पदी मुशीर खान कोटकर निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, पत्रकार अश्रफ पटेल,सुष्मा राऊत यांचा ही सत्कार करण्यात अ‍ॅड.काझी यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, पोळ्याच्या निमित्ताने आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी गावातल्या पोळ्यामध्ये येणाऱ्या उत्कृष्ट बैल जोडीचा त्यांच्या मालकांचा सत्कार हा पक्षाच्या वतीने केला गेला पाहिजे. या उदात हेतूने बैल जोडीचा सत्कार त्याच्या मालकाचा सत्कार खुप सुंदर रित्यशा घेण्यात आलेला आहे. पुढे बोलतांना डॉ.शिंगणे म्हणाले की,उद्धव म्हसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कमी दिवसात जे नियोजन बद्ध कार्यक्रम पार पाडला ते कौतुकास्पद आहे.आज शेतकऱ्यांच मनोबल वाढवण्यासाठी चे प्रयत्न आपण केलेच पाहिजे, आणि ते आपण योग्य पध्दतीने केले आहे त्याबद्दल सर्व टीम चे अभिनंदन यावेळी शिंगणे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर कोल्हे यांनी केले तर आभार सदाशिव मुंढे यांनी व्यक्त केले. यावेळी प.स.मा.सभापती गजेंद्र शिंगणे,भिकाजी शिंगणे,राजीव सिरसाट,राजू पठाण,सै.करीम, गजानन चेके,अनिल शेळके,सदाशिव देशमुख,मखनराजे जाधव, विठ्ठल देशमुख, गजानन देशमुख, निलेश गीते, नितीन कणखर ,आकाश जाधव,विष्णू बनकर,पत्रकार दत्ता हांडे,धनंजय माहिते, बैरागी व तालुक्यातील शेतकरी व नागरिक हजारोच्या संख्येत उपस्थित होते.
0 8 9 4 7 0
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *