सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील नादातांडा येथे सेवा प्रतिष्ठान प्रणित नादातांडाचा राजा सर्वाजनिक गणपती विसर्जन सोहळा मोठ्या जल्लोषात व शांततेत पार पडला गावात एकच मिरवणूक न डिजे न बाँन्ड लावता शांततेत मिरवणूक पार पडली.सार्वजनिक मंडळाच्या गणपती असून येथील सर्व गणेश मंडळाच्यावतीने आज दि.९ सप्टेंबर रोजी टाळ मृदंगाचा गजर,लेझीम, ढोलताशे व पुष्पांच्या पाकळ्यांची उधळण करून गणेश विसर्जन करण्यात आले.नादातांडा येथे या वर्षी गणेश मंडळाच्या गणपतीची स्थापना करण्यात आली होती.आज विसर्जनाच्या दिवशी मंडळाने डी.जे. बँड व गुलालाची उधळण न रामदेव बाबा मंदिरापासून गणपती बाप्पाची मिरवणूकीला सुरुवात झाली होती. यावेळी वरदानसिंग ठाकूरसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हरिहरी वारकरी ,धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देत सांप्रदायिक पद्धतीने वारकऱ्यांच्या सुमधुर आवाजात अभंग,गवळण गात टाळ मृदंगाच्या गजरात आणि सुगंधित पुष्प फुलांची उधळण करत,सोबत गावकऱ्यांनी लेझिम खेळत ठेका धरला होता.अशा भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन,आणि गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर महिलांनी संपूर्ण गावामध्ये रांगोळीने रस्ते सुशोभित केले होते तर महिलांनी जागोजागी पुष्प फुलांनी श्री गणेशाची पूजा केली.अशा या भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांना निरोप सर्व मंडळाच्या मान्यवर व गावकऱ्यांनी दिला आहे.यावेळी गणेश मंडळाचे भक्त सागर पवार अध्यक्ष, लखन राठोड, आकाश राठोड, ऋषीकेश चव्हाण, आत्माराम चव्हाण, राजू जाधव, अमोल चव्हाण, नितेश चव्हाण, विलास जाधव, रामेश्वर जाधव, अर्जुन चव्हाण, नवल चव्हाण, अनिल चव्हाण, मंगल चव्हाण, राहुल जाधव, मुकेश राठोड, पृथ्वीराज चव्हाण, मनोज चव्हाण, रवी पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता फर्दापूर येथील पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास बाळासाहेब वाघमोडे व उपनिरीक्षक रणजित कासले यांच्या मार्गदर्शनाखाली सावळदबारा बिटजमादार मिरखाँ तडवी, पो.काँ.शिवदास गोपाळ,होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अशी माहिती गणेश मंडळाच्या वतीने वरदानसिंग चव्हाण(सामाजिक कार्यकर्ते)यांनी सोयगाव तालुकाचे खोज माष्टर न्यूजचे प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.
Users Today : 26