बिगर सातबारा शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न

Khozmaster
3 Min Read
दलित पँथर चे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांचा फासे पारधी महिलांनी केला सत्कार
*भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात बिगर सातबारा शेतकऱऱ्यांनी संघटित होण्याची प्रदेश अध्यक्ष नंदू पाटील काठोळे यांचं आव्हान
वाशीम,:अनुचित जाती अनुचित जमाती भटके विमुक्त भूमिहीन ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या शेतकरी यांच्या न्याय हक्का साठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली संघटना म्हणजे बिगर सातबारा शेतकरी संघटना या संघटनेची महत्वपूर्ण बैठक वाशीम जिल्यातील चिखली येथे फासे पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नंदू पाटील काठोळे यांच्च्या अध्यक्ष तें खाली संपन्न झाली या बैठकीला दलित पँथर चे केंद्रीय कार्याअध्यक्ष तथा संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत
मार्गदर्शन करतांना भाई जगदीश कुमार इंगळे म्हणाले किं शेतकरी हा देशाच्या अर्थ व्यवस्थे चा कणा आहे शेतात राबराब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना जात नाही त्याला धर्म नाही जो जमीन पीकवितो तो शेतकरी मग तो सातबारा वाला असो किं बिगर सातबारा वाला, मराठा कुणबी असो कि दलित असो कि फासे पारधी असो सर्वांनी पीकविलेला माल एकाच मंडीत विकला जातो दहा शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या जातीच्या जसे दोन मराठी एक कुणबी एक आदीवासी दोन फासे पारधी काही मातंग काही बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांनी आपापले शेतातून वेगवेगळ्या पोत्यात सोताबीन भरून मंडीत विकण्यासाठी आणली आणि एका व्यापाऱ्यांला विकली त्या व्यापाऱ्यांनी सर्वांचे पोते विकत घेतले आणि सर्व पोत्यातली सोयाबीन एकत्र करून गोदमात टाकली आणि एकत्र त्याचा ढीग लावला तर त्यामधील मराठी माणसाची कोणती आदीवासी माणसाची कोणती फासे पारधी माणसाची कोणती मातंग माणसाची कोणती बौद्ध माणसाची कोणती ओळखता येत नाही नि रनिराळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पोत्यात भरलेले सोयाबीन एकत्र झाल्यास तें एकत्र येण्यासाठी भेदभाव करत नाही मग शेतकऱ्यांना भेदभाव का होतो असा प्रश्न बैठक मध्ये उपस्थित करून सरकारकडून शेतकऱ्यांना भेदभाव निर्माण केल्या जातं असेल तर बिगर सातबारा शेतकरी संघटना खपवून घेणार नाही असा ईशारा भाई इंगळे यांनी दिला
राज्यात लाखो शेतकरी जमीन पीकवितात जमीन त्यांच्या कब्जात आहे परंतु सातबारा त्यांचा नावावर नाही सातबारा त्यांच्या नावावर झाला पाहिजे याकरिता महाराष्ट्र राज्य सरकार चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर मोर्च्या आयोजित करणार असल्याचे भाई जगदीश कुमार इंगळे यांनी सांगितले यावेळी फासे पारधी महिला पुरुषांनी भाई इंगळे यांच्या गळ्यात पुष्प माळा घालून सत्कार केला या बैठकीला शेकडो बिगर सातबारा शेतकरी उपस्थित होतें या बैठकीचे आयोजन जिल्हा कार्याध्यक्ष गजानन भाऊ वानखेडे विमल पवार सांगितरावं पवार शिला पवार यांनी केले होते.
0 8 9 4 5 5
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *