प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे नागरिक त्रस्त..!!

Khozmaster
3 Min Read
  • दिपक मापारी, रिसोड

रिसोड तालुक्यातील केनवड ते कोयाळी जाधव नावली फाटा. तालुक्याच्या ठिकाणी जाणारा हा जवळचा व सोईचा मार्ग आहे. तरी या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली. असून वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांच्याकडे मागणी करून सुद्धा काम निकृष्ट दर्जाची केले. रस्ता अजून पूर्ण देखील झालेला नसून खडकीकरण हे अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले आहे..केनवड पासून कोयाळी जाधव नावली फाटा इथपर्यंत रस्ता अतिशय खराब झालेला. असून सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या प्रकरणाची माहिती वेळोवेळी मा. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांच्याकडे केली परंतु सदर प्रकरणाकडे प्रशासनाने डोळे-झाक केल्यामुळे याचा प्रचंड त्रास रोडवर ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. या प्रकरणाची वेळोवेळी मागणी प्रशासनाकडे केली असता. त्यांनी अर्धवट काम पूर्ण केले. कोयाळी जाधवच्या सीमेपासून कोयाळी जा.पर्यंत चांगल्या असलेल्या रस्त्याचे काम प्रशासनाने पूर्ण केले. मात्र केनवड पासून कोयाळी जाधव च्या सीमेपर्यंतचे काम खडकीकरणावर भागवले सदर खडकीकरण हे अतिशय निकृष्ट दर्जाचे .असून सदर रस्ता जशाच तसा आहे. रिसोड तालुक्याच्या ठिकाणी जाणारा हा जवळचा व अतिशय सोईचा मार्ग आहे. तरी या रस्त्यांमुळे येथील ये-जा करणाऱ्या नागरिकांना गर्भवती महिलांना, आजारपणातील वयोवृद्धांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. रोड निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे रोड लगत गावातील नागरिकांची घरे आहेत.धुळीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याची सुद्धा तक्रार प्रशासनाने सतत केली.पण प्रशासनाने कुठल्याही प्रकारे उपाययोजना केली नाही.या धुळीमुळे नागरिकांना अनेकानेक आजारांना तोंड द्यावं लागत आहे. रोडवरील ये-जा करणाऱ्या वाहनामुळे रोडवर धुळीचे साम्राज्य उभे राहले आहे. तरी प्रशासनाने यावर कुठलाच पर्याय काढला नाही. या मुळे नागरिकांना प्रशासन हेतू पुरस्कर या प्रकरणाकडे डोळे झाक करत आहे. असा संभ्रम निर्मान झाला आहे. तरी संबंधित महत्त्वाचा प्रश्न मार्गी अजून सुद्धा लागला नाही. तरी सन्माननीय साहेब आपण या संबंधि कायदेशीर कार्यवाही करावी. व केनवड ते कोयाळी जाधव नावली फाटा पर्यंत संपूर्ण रस्ता उत्कृष्ट दर्जाचा करावा जेणेकरून नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच केनवड गणेशपूर या गावावरुन कोयाळी जा.कडे जाणाऱ्या पुलाची उंची वाढवणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये पुलवरून पाणी जाते त्या मुळे आजारी वृद्धांना. गर्भवती महिलांना केनवड येथे दवाखान्यात जाता येत नाही. आणि म्हणून सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कार्यवाही केली गेली नाही. व सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला नाही. तर वेळ प्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरू.

– विष्णु बाजड अध्यक्ष कास्तकार फाऊंडेशन यांचे जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन.

0 9 4 5 6 1
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *