सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे जि. प. प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा यानां निरोप देण्यात आला.यानंतर दि.१०/९/२२ शनिवार रोजी
आमच्या शाळेचे मनमिळाऊ स्वाभावाचे,विद्यार्थीनीला अती प्रिय अशा सरकटे मँडम शिक्षिका यांची बुलढाणा येथे बदली झाल्यामुळे जि.प.प्राथमिक शाळा सावळदबारा शाळेच्या वतीने जड अंत:करणाने सरकटे मँडम शिक्षिका व त्यांचे पती याचां छोटेखानी निरोप देऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व त्यानां बदलीचा निरोप म्हणून शिक्षकवृंद यांनी आपली ताई समजून शाल,श्रीपळ साडी देऊन सत्कार केला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक आर. एच. चव्हाण,शाळेय व्यास्थापन समितीचे अध्यक्ष व जि.प. प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.डी सोनोने,भागवत गायकवाड,निता हिरास मँडम, सतीश ढोणे,गवई सर व विद्यार्थी उपस्थित होते.या छोटेखानी निरोप कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सुरवात भागवत गायकवाड व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयन्त केले. यावेळी केंद्र प्रमुख एम. डी. सोनोने सावळदबारा,जनार्दन साबळे, मुख्यधापक गायकवाड सर, पदवीधर शिक्षक दिपक चोपडे, मुख्यधापक गवळीसर, आर. एच. चव्हाण वरील सर्व मान्यवर वेळात वेळ काढून व आमच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमास उपस्थित राहिल्या बद्दल शाळेच्या वतीने मुख्यधापक एम. डी. सोनोने सावळदबारा यांनी छोटेखानी सरकटे मँडम शिक्षिका निरोप देतांना आभार मानले.
Users Today : 1