गाडीला कट मारल्यावरुन राडा, होमगार्डची साथीदारासह दोघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
नागपूर: रामटेक येथील कार्तिक पौर्णिमेनिमित्त गडमंदिरावरून परत येत असताना होमगार्ड आणि त्याच्या साथीदाराने दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन तरुणांना मारहाण केल्याची घटना रामटेक पोलिस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली आहे. या मारहाणीत एक…
अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने दिले आदेश
नागपूर : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीवर राज्य सरकारही सक्रिय झाले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.…
मुलाचा अपघाती मृत्यू, विम्याचे पैसे मिळाले पण आई-वडील न्यायालयात, सुनेला पैसे काढण्यास बंदी, काय घडलं?
नागपूर: मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर नुकसान भरपाईच्या रकमेसाठी वृद्ध माता पित्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. आपण मृत व्यक्तीचे पालक असून निराधार आहोत तरीसुद्धा मोटार अपघात दावा प्राधिकरणाने आपल्या तुलनेत सुनेला…
मुलीला बंधक बनवून सिगारेटचे चटके दिल्याचं प्रकरण, तीन महिने पोलिसांकडून शोध,अखेर फरार हिना खानला बेंगळूरूत अटक
नागपूर:अल्पवयीन मुलीला बंधक बनवून तिला सिगारेटचे चटके देण्यासह अमानुष छळ केल्याप्रकरणात फरार असलेली हिना अरमान खानला गुन्हेशाखा पोलिसांनी अखेर अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी तिचा पती . ताहा अरमान इस्तियाक खान…
मेळघाट व्याघ्रप्रकल्पात फुलपाखरांच्या ८८ प्रजातींची नोंद; ‘या’ आहेत सात नव्या प्रजाती
नागपूर : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात झालेल्या फुलपाखरू सर्वेक्षणात ८८ प्रजातींच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सात नवीन प्रजाती आढळल्या आहेत. या नव्या नोंदीमुळे मेळघाटातील एकूण फुलपाखरू प्रजातींची संख्या आता १४१ इतकी झाली…
भोंगळ कारभार! चक्क विमानातील सीटची गादी गायब ; व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी इंडिगोला धरलं धारेवर
नागपूर: पुण्याहून नागपूरकडे निघालेल्या इंडिगो हवाई वाहतूक कंपनीच्या विमानातील एका आसनाची गादी गायब झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. प्रवाशाने तत्काळ या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यावर कंपनीने लवकरच आसन व्यवस्थित…
मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित; छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही, ते एक…; काँग्रेसचा घणाघाती आरोप
नागपूर.राज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे इतरत्र वळवण्यासाठी मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात नौटंकीचे मंत्रिमंडळ आहे. कुणाला मंत्री ठेवायचे, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार…
ना विमान, ना ट्रॅव्हल्स… दिवाळीत ‘समृद्धी’च! महामार्गावरुन विक्रमी संख्येने धावल्या कार
नागपूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घर जवळ करायचे आहे; पण विमानभाडे अव्वाच्या सव्वा आहे. प्रयत्न करूनही रेल्वेचे तिकीट मिळाले नाही. ट्रॅव्हल्सच्या भरमसाठ दराच्या तिकीट काढण्यासाठी मन तयार होत नाही. अशा वेळी काय…
तडीपारी संपवून आला, पण आता जेलची हवा खाणार; दारुच्या नशेत गुंडाचं मित्रासोबत भयंकर कृत्य
नागपूर : दारू पिल्यावर झालेल्या वादातून दोन मद्यपी मित्रांनीच एका गुंडाची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना लकडगंज हद्दीतील टेलीफोन एक्सचेंज चौक, मेट्रो स्टेशनच्या बाजुला, आगलावे दारू भट्टीजवळ शुक्रवारी रात्री ७.३०…
भूतबाधेची भीती दाखवून महिलेची १३ लाखांनी फसवणूक, जादूटोणा करणारे दोघे गजाआड
नागपूर : घरात भूतबाधा झाली असून, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असे सांगून त्या दूर करण्यासाठी पूजेच्या बहाण्याने महिलेकडील रोख रकमेसह १२ लाखांचे दागिने हडपण्यात आले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीसह…
