नातवंडांना भेटायचंय तर दीड कोटी दे, बहिणीकडे खंडणीची मागणी, जीवे मारण्याचीही धमकी, पुण्यात खळबळ
पुणे : पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. नातवंडांना भेटण्यासाठी गेलेल्या बहिणीकडे लहान भावाने दीड कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. जर पैसे दिले नाही तर…
जिल्हा न्यायाधीशांनी टोचले पुणे पोलिसांचे कान; तक्रारींचा पाढाच वाचला, काय घडलं?
पुणे : धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची खंत जिल्हा न्यायाधीशांनी व्यक्त केली असून, इतर गुन्ह्यांतील आरोपींना समन्स आणि वॉरंट बजावण्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे निरीक्षण…
नववर्षात ‘रिंग रोड’ला मुहूर्त; लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या हालचाली
पुणे : पुण्याचा विकासासाठी द्रुतगती महामार्ग ठरू शकणाऱ्या ‘रिंग रोड’च्या कामांना लोकसभा निवडणुकीच्या आधी मुहूर्त मिळण्याची चिन्हे आहेत. रिंग रोडच्या कामांचे भूमिपूजन येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारीत केले जाणार असल्याचे संकेत महाराष्ट्र…
धक्कादायक! वाढदिवशी आवडती भेटवस्तू दिली नाही; पत्नीला राग अनावर, नाकावर ठोसा मारला, पतीचा मृत्यू
पुणे: वानवडी येथे पत्नीच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या पतीचा नाकावर ठोसा मारल्याने नव्हे; तर धारदार शस्त्राने मारहाण केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दुबईला वाढदिवस साजरा केला नाही; तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनपसंत…
फुकट्या प्रवाशांवर पीएमपीची कारवाई; तब्बल ‘इतका’ दंड वसूल, वाचा सविस्तर…
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. गेल्या दहा महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून सव्वा कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महिन्याला अंदाजे दहा लाख…
पुणे ते लोणावळा रेल्वेचा वेग वाढणार; स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेचे काम पूर्ण, ‘असा’ होणार फायदा
पुणे: पुणे रेल्वे विभागातील पुणे ते लोणावळा दरम्यानचे स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेचे काम रविवारी अखेर पूर्ण झाले. त्यामुळे आता पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वे गाड्यांचा वेग वाढून त्याचा प्रवाशांना फायदा होणार…
Devgad Hapus: हंगामपूर्व देवगड हापूस पुण्यात दाखल; डझनचा भाव ऐकून बसेल झटका
पुणे : देवगड हापूसच्या आगाप उत्पादनातील (हंगामपूर्व) आंबा रविवारी (२६ नोव्हेंबर) पुण्यात दाखल झाला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्या गाळ्यावर पाच…
हवेचा दर्जा खालावला; प्रदूषण करणाऱ्या ६०४ जणांना महापालिकेचा दणका, दंडाची रक्कम वाचून व्हाल चकित
पिंपरी: राज्यातील विविध शहरांसह पिंपरी-चिंचवडमधील हवेचा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक, विक्रेते आदी ६०४ जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १३ दिवसांत…
अजित पवार म्हणाले, जागावाटपावर चर्चा नाही; फडणवीसांनी थेट आकडेच सांगितले; कोणाला किती जागा?
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढेल आणि लवकरच तिन्ही पक्ष जागावाटपाला अंतिम…
जनावरांना घेऊन रानात, मुलगी पुन्हा परतलीच नाही; आई-वडिलांची लाडकी लेक गेली, तलावात बुडून अंत
पुणे (खेड) : पुण्यातील खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या कळमोडी धरण परिसरात असणाऱ्या घोटवडी येथे एका १३ वर्षीय विद्यार्थिनीचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या…
