भावाच्या मृत्यूचा धक्का: अंत्यसंस्काराला गेलेल्या बहिणीने मृत भावाच्या मांडीवरच प्राण सोडले
हिंगोली : वयोवृद्ध मोठ्या भावाचे निधन झाल्याची दुःखद बातमी कळाल्याने अर्धापूर येथे अंत्यविधीसाठी गेलेल्या बहिणीला भावाचा मृतदेह पाहताच मोठा धक्का बसला व त्यात बहिणीचे निधन झाल्याची घटना घडली आहे. या हृदयद्रावक…
Nilesh Rane: आमच्यात जे ठरलंय तसंच होईल ही आशा, फडणवीसांच्या भेटीबाबत निलेश राणेंचं सूचक वक्तव्य
सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणेंची नाराजी भाजपच्या नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केल्यानंतर आज ते प्रथमच सिंधुदुर्गात आले.यावेळी कुडाळ व मालवण मधील शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.…
खड्डा चुकवण्याच्या नादात खासगी बस पलटली; अपघातात १ प्रवासी जागीच ठार, ८ जखमी
वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील छोटी आर्वी शिवारात खड्डा चुकवण्याच्या नादात खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडला असून या घटनेत एका प्रवाशाचा…
कॉफी शॉपच्या नावाखाली नको तो उद्योग, पोलिसांनी धाड टाकली अन् अश्लील चाळे करणारी जोडपी रंगेहाथ सापडली
जालना: २५०ते ५०० रुपयांत अश्लील चाळे करण्यासाठी तरुण- तरुणींना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या जालना शहरातील मंठा रोडवरील कॅफे फुड ट्रेझर कॉफी सेंटरवर सदर बाजार पोलिसांनी कारवाई केली आहे.जालना शहरातील मंठा चौफुली…
धक्कादायक! ज्या शाळेत ज्ञानाचे धडे दिले तिथेच घेतला टोकाचा निर्णय; शिक्षकाने वर्गातच आयुष्य संपवलं
जालना: शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबड तालुक्यातील मठ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. केरुबा दिगंबर घोडके (५०) असे मयत शिक्षकाचे नाव…
पीकविमा सर्वेक्षणासाठी मागतात पैसे; तक्रारीनंतर प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची लूट उघड, नेमकं काय घडलं?
यवतमाळ : अतिवृष्टीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने हादरलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नि:शुल्क सर्वेक्षणासाठी पैसे मागत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.वणी तालुक्यातील शेतकरी राजेश श्यामराव गारघाटे…
रखडलेला पाऊस, अपुरं पीककर्ज अन् कापूस सोयाबीनचे पडलेले भाव, २०२३ मध्ये विदर्भातील १५८४ शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल
यवतमाळ: शेतकऱ्यांचा वार्षिक महत्वाचा पोळा सण नुकताच महाराष्ट्रभर साजरा झाला. आता गणरायाचे आगमन होत आहे. हे होत असताना विदर्भात वर्षभरात शेतकऱ्यांच्या १५८४ आत्महत्या झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये पाच…
जत, आटपाडी, कवठेमहांकाळसह खानापूर दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून गायब, पालकमंत्री संतापले
सांगली : यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात सरासरी गाठलेली नाही त्यामुळे दुष्काळी स्थिती ओढवली असनू आठ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. मात्र चार तालुके दुष्काळापासून वंचित ठेवले. जत, आटपाडी, खानापूर आणि कवठेमहांकाळ…
कौतुकास्पद…! चक्क कुलुपात साकारला बाप्पा; सांगलीतील शेख बंधू ठरलेत धार्मिक सौहार्दाचे प्रतीक
सांगली: सांगलीतील शेख बंधूंनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. मुस्लिम असूनही गणरायावर श्रद्धा असणाऱ्या शेख बंधूंनी चक्क कुलपात गणपती साकारला आहे. शेख बंधूंनी बनवलेले गणेशाची मूर्ती असणारे पितळी कुलूप सांगलीत…
व्यसनी मुलाची आई-वडिलांना मारहाण, पैशांसाठी तगादा, कंटाळून पित्याचा धक्कादायक निर्णय, काय घडलं?
सोलापूर: वारंवार दारूसाठी पैसे मागून वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाचा चिडलेल्या वडिलांनी धारदार शस्त्राच्या साह्याने खून केल्याची घटना सोलापूरात घडली. मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करून वडिलांनी लेकाले संपवले. व्यसनी मुलामुळे संपूर्ण…
