एकजूट ..
पाण्यावर मारतात
जोराजोरात काठी
पाण्या नसे दुफळी
दुबळी पडेल लाठी
कोण करील वेगळे
आपणांत एकजुटी
प्रत्येक बोटा शक्ती
आवळता घट्ट मुठी
लाटा मागूनि लाटा
आदळे समुद्रा तटी
लाटेत ताकदअशी
होते पहाडात फुटी
पाणी घेई सामावून
सकलाआपले पोटी
न्यायकरावा तसाचं
रे समान सर्वांसाठी
मनात नसावी अढी
भाळी नको आठी
मने असावी स्वच्छ
एकजूट होणे साठी
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
www.kavyakusum.com
