परगाव ..
स्थिती पहा आमची
काळजा घेईलं ठाव
सिमावर्ती भागातले
आमचे मागास गाव
सिमावाद भडकता
आम्हां मिळतो भाव
इलेक्शन झाल्यावर
हाल आमचे बेभाव
तिकडे जातो म्हणून
मांडला जेंव्हा ठराव
विहीरी मधले बेडूक
करायं लागले डराव
साध्या हव्यात सोयी
जास्तीची नाही हाव
कधी तरी पटलावरी
आणावे गावाचे नाव
वल्हवत राहतो उगा
भोके पाडलेली नाव
विकास जातो वळून
दिसेना ठिकाणाठाव
चेंडू जाता सिमापार
कधीतरी होई उठाव
ये पाहुणे पाचवर्षांनी
कावळे करती काव
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996.
