श्रीरंग

KHOZ MASTER
1 Min Read
श्रीरंग ..
पेढेबर्फी प्रिय दोन्ही 
कशासाठी घेई सोंग
नारीसंस्कृतीचं खरी
पुरे  करे मिथ्या ढोंग
पुत्र जन्मला गं सखे
फिटे जन्मांतरी पांग
बुवा बापडे आश्रमी
छुपी लपी भली रांग
मुलगी का नको वाटे
मुलगा  व्हावा  दबंग
कृतीत दिसे  विकृती 
वृत्ती अशी का भडंग
परिवर्तन  कसे व्हावे
मुळांवर लावी  सुरुंग
जुन्यारिती चालीरुढी
चोहो  बाजूनि  तुरुंग
अडकलो  आपसात 
डोईवरी  सांबर शिंग
नव्या  युगाची  नांदी 
फुकायची  रण शिंग 
ऐकता  कन्या ध्वनी
कसा असा हो बेरंग
देवकीला जाई बळी
वंश वाढवेलं  श्रीरंग 
– हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *