जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये वैष्णवी धंदरेचा प्रथम क्रमांक

Khozmaster
1 Min Read
अकोला (भुषण महाजन)
अनुसूचित जाती मुलींची शासकिय निवासी शाळा, गोरेंगांव खुर्द येथील विद्यार्थी कु. वैष्ण़वी धंदरे यांनी 14 वर्षाखालील जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्ध़ेमध्ये प्रथम क्रमांक पटकविला.येथील वसंत देसाई क्रिडा संकुलाच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये गुरुवारी दि.15 डिसेंबर रोजी अनुसूचित जाती  मुलींची शासकिय निवासी शाळेतील वर्ग आठवीची विद्यार्थींनीने 100 मी व 200 मी. धावणे स्पर्धेंत प्रथम क्रमांक मिळवला तर लांब उडी स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवून एकाच खेळाडूने तीन पदके  मिळवले. या  कामगिरीकरीता क्रिडा विभागामार्फत कु. वैष्ण़वी धंदरे यांना उत्कृष्ट  खेळाडू म्ह़णून गौरविण्यात आले. तिच्या उल्लेखनिय कागगिरीचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *