21 ते 22 डिसेंबर दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार यांचेमार्फत 21 ते 22 डिसेंबर,2022 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने या रोजगार मेळाव्यात अपोलो होम हेल्थकेअर लिमिटेड, मुंबई आणि शुभम सर्व्हिस, पुणे या कंपनींचा मेळाव्यात सहभाग घेऊन  दोन्ही कंपनीमार्फत 700 उमेदवाराची ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.  नोंदणी न केलेल्यांनी शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल.  तो वापरुन पोर्टलवर लॉगीन करावे. त्यानंतर आपल्या नोंदणीच्या माहितीतील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर मधील दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील नंदुरबार जिल्हा निवडून त्यातील रोजगाराची माहिती पहावी व  रिक्तपदांची माहिती पाहून नोंदणी करावी.  त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होईल.याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 02564-295801 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.  जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन  सहायक आयुक्त  रिसे यांनी केले आहे.
0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *