विशेष प्रतिनिधी ;-
नंदुरबार जिल्ह्यातील सुझलॉन टॉवरमधील कॉपर केबल चोरीचे दोन मोठे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत. या यशस्वी कारवाईत पोलिसांनी कॉपर केबल चोरणारे तसेच चोरीचा माल विकत घेणारे भंगार व्यापारी मिळून तब्बल १८ आरोपींना अटक केली असून,
₹५ लाख २२ हजार २०० किमतीचा ५२६ किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिला गुन्हा – जुन महिन्यातील चोरी
दिनांक ३ ते २० जून २०२५ या कालावधीत शनिमांडळ, बलवंड, वटबारे आणि आक्राळे शिवारातील सुझलॉन टॉवरमधील कॉपर केबल धारदार हत्याराने कापून चोरी करण्यात आली होती.
या प्रकरणी गु.र.नं. ३१५/२०२५ नोंदविण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर साक्री तालुक्यातील हट्टी गावातील सराईत आरोपी सुकलाल बाबुलाल कुन्हाडे आणि त्याचे साथीदार प्रविण ठाकरे, शरद पदमोर, देवा सोनवणे, राजेंद्र पदमोर यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
चोरीचा माल त्यांनी दोंडाईचा येथील भंगार व्यापारी शन्नु ऊर्फ मुस्ताक शाह फकूर याला विकल्याचे उघड झाले.
या गुन्ह्यात पोलिसांनी ११ लाख ५६ हजार १०० किंमतीची २२३ किलो कॉपर वायर जप्त केली आहे.
दुसरा गुन्हा – ऑगस्ट ते नोव्हेंबरमधील चोरी
दिनांक ८ ऑगस्ट ते १ नोव्हेंबर २०२५ दरम्यान भोणे, वावद, चाकळे, आक्राळे, ठाणेपाडा परिसरातील सुझलॉन टॉवरमधून कॉपर वायर चोरीला गेल्याचा दुसरा गुन्हा (गु.र.नं. ३८३/२०२५) नोंदवण्यात आला होता.
तपासात चौपाळे गावातील विजय वळवी, सुनील वळवी व त्यांच्या साथीदारांचा सहभाग स्पष्ट झाला. पोलिसांनी नंदुरबार–चौपाळे रस्त्यालगत सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ३०३ किलो कॉपर वायर, वजनकाटा, रिक्षा आणि रोख रक्कम असा ₹३ लाख ६६ हजार १०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यातील आरोपींमध्ये विजय संजय वळवी, निहाल काकर, सिकंदर काकर (गुजरात), कमलेश वळवी, आकाश गवळे, प्रशांत पवार, अर्जुन पवार, योगेश पिंपळे, दिनेश वळवी, सुनील वळवी, रविंद्र शिंदे आणि अजय शिंदे यांचा समावेश आहे.
चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यापाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
कारवाईचे नेतृत्व
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
या पथकात
पो.उ.नि. मुकेश पवार, विकास गुंजाळ,
पो.ह. मुकेश तावडे, दिनेश चित्ते, सुनिल वेलवे, मोहन ढमढेरे, विशाल नागरे, ज्ञानेश्वर पाटील, अजित गावीत, अभय राजपूत, आणि राजेंद्र काटके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नंदुरबार पोलिसांचे आवाहन:
“औद्योगिक परिसरातील मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्ष राहावे. चोरीसंबंधी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी
Users Today : 18