नंदुरबार ;-
जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील जुनी पिंप्राणी शिवारात बेकायदेशीर गांजाच्या लागवडीवर धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी ९८ किलो ३४७ ग्रॅम वजनाचा, एकूण ₹१९ लाख ८३ हजार ४७० किंमतीचा गांजा हस्तगत केला आहे.
तपासाची सुरुवात
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, म्हसावद परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीर गांजाची शेती करत आहे.
अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या सूचनेनुसार, पाटील यांनी तातडीने पथक तयार करून छापा टाकण्याची योजनाकारवाईचा तपशील
पोलिसांनी संशयित सुन्त्या ऊर्फ सुरसिंग डुगर्या पाडवी (रा. जुनी पिंप्राणी, ता. शहादा) याच्या शेतावर छापा मारला असता, कापसाच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड केल्याचे आढळले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी ९८ किलो ३४७ ग्रॅम गांजा जप्त केला.
गुन्हा दाखल
प्राथमिक चौकशीत आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची लागवड केली असल्याचे स्पष्ट झाले.
त्याविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २१२/२०२५ अंतर्गत
NDPS कायद्यातील कलम २०(अ)(ब), २२(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे मार्गदर्शनाखाली
पो.नि. हेमंत पाटील, पो.उप.नि. मुकेश पवार, विकास गुंजाळ
असई राकेश वसावे, पो.हे.कॉ. दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, येलवे, पुरुषोत्तम सोनार, सचिन वसावे, पो.ना. दीपक वारुळे, विकास कापुरे, पो.शि. रामेश्वर चव्हाण आणि
यांनी केली.
नंदुरबार जिल्हा पोलीस दल अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री पूर्णपणे थांबविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे पोलिसांनी सांगितले.
Users Today : 18