शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
मुख्यमंत्री शांश्वत कृषि सिंचन योजनांतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेतंर्गत यंत्राद्वारे इनलेट/आउटलेट विरहीत व इनलेट/ आउटलेट सह शेततळे खोदाई व सिल्ट ट्रेपसह वैयक्तिक शेततळे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.योजनेचा लाभ घेऊ इच्छुक शेतकऱ्यास खोदाई व सिल्ट ट्रेपसह आकारमान व अनुदान पुढील प्रमाणे अनुज्ञेय राहील: इनलेट / आउटलेट विरहीत 15 x15x3 बाजूउतार (1:1) आकारमानसाठी अनुदान 18 हजार 621, 20x15x3 आकारमानसाठी 26 हजार 774, 20x20x3 आकारमानसाठी 38 हजार 417, 25x20x3 आकारमानसाठी 50 हजार 61, 25x25x3 आकारमानसाठी 65 हजार 194, 30x25x3, 30x30x3, 34x34x3  आकारमानसाठी 75 हजार रुपये  अनुदान देय राहील.तर 15x15x3 बाजूउतार (1:1:5 मीटर) आकारमानसाठी 14 हजार 433, 20x15x3 आकारमानसाठी 21 हजार 539, 20x20x3 आकारमानसाठी 32 हजार 135, 25x20x3 आकारमानसाठी 42 हजार 731, 25x25x3 आकारमानसाठी 56 हजार 818, 30x25x3, आकारमानसाठी 70 हजार 904, 30x30x3, 34x34x3  आकारमानसाठी 75 हजार रुपये  अनुदान देय राहील.इनलेट / आउटलेट 15 x15x3 बाजूउतार (1:1 मीटर) आकारमानसाठी अनुदान 23 हजार 881, 20x15x3 आकारमानसाठी 32 हजार 34, 20x20x3 आकारमानसाठी 43 हजार 678, 25x20x3 आकारमानसाठी 55 हजार 321, 25x25x3 आकारमानसाठी 70 हजार 455, 30x25x3, 30x30x3, 34x34x3  आकारमानसाठी 75 हजार रुपये  अनुदान देय राहील.इनलेट / आउटलेट 15 x15x3 बाजूउतार (1:1 मीटर) आकारमानसाठी अनुदान 19 हजार 693, 20x15x3 आकारमानसाठी 26 हजार 799, 20x20x3 आकारमानसाठी 37 हजार 395, 25x20x3 आकारमानसाठी 47 हजार 991, 25x25x3 आकारमानसाठी 62 हजार 78, 30x25x3, 30x30x3, 34x34x3  आकारमानसाठी 75 हजार रुपये   अनुदाय देय राहील.तरी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर आपले अर्ज मोबाईलद्वारे, संगणक, सामुदायिक सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीतील संग्राम कक्ष इत्यादी ठिकाणाहून भरुन या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
  असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी आवाहन केले आहे.
0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *