पालिका शाळेचा दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

Khozmaster
2 Min Read
खेळाला जीवनाच्या अविभाज्य घक म्हणून स्वीकारा; नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
बालपण हे परत येत नसल्याने बालपणाच्या आनंद घेतलाच पाहिजे.विद्यार्थ्यांना ज्या खेळात आवड असेल त्यांनी त्या खेळांमध्ये सहभागी व्हायचे परंतु, खेळांमध्ये स्पर्धा नको.खेळाडूंनी स्पर्धेला ‘स्पर्धा’म्हणून न पाहता खेळाला जीवनाच्या अविभाज्य घटक म्हणून स्वीकारला पाहिजे असे प्रतिपादन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केले.नंदूरबार नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळांतर्गत २ दिवशीय शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शाळा क्र.१ मध्ये सोमवारी नगराध्यक्षा. रत्ना रघुवंशी यांनी मशाल प्रज्वलित करून केले. त्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतांना त्या बोलत होत्या. प्रास्ताविक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांनी केले.यावेळी रघुवंशी म्हणाल्या, शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थी खेळाडूंचे आरोग्य बळकट करण्याचे काम शिक्षक करीत असतात. खेळांमध्ये जे विद्यार्थी तरबेज असतील त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन राज्य पातळीवर पोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.उपनगराध्यक्ष कुणाल वसावे यांनी नारळ फोडून  लंगडीचा सामाना सुरु केला.यावेळी पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक परवेज खान,नगरसेवक रविंद्र पवार, फारुख मेमण, शिक्षण मंडळाचे माजी सभापती दिलीपकुमार शाह, जगन्नाथ माळी,चेतन वळवी,रियाज कुरेश उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मोमिन जमील अहमद अ., रणजीत नाईक, करणसिंग चव्हाण, शिरिष पवार, फिलीप मावची,संतोष सदाराव व सर्व शिक्षकांनी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काझी व  निशा सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय सोनवणे यांनी केले.
मैदानी सामना रंगला
 क्रीडा महोत्सवात लंगडी लहान-मोठा गट, खो खो मोठा गट, कब्बडी मोठा गटातील विद्यार्थी खेळाडूंनी स्पर्धेत चुरस निर्माण करून मैदान चांगलेच गाजवले.
आजचे सामने
आज मंगळवारी दोरी उडी लहान मोठा गट,लिंबु चमचा लहान मोठा गट, पोते शर्यत लहान-मोठा गट गट,शंभर मिटर धावणे लहान मोठा गट, संगीत खुर्ची लहान मोठा गट असे विविध खेळ खेळविण्यात येतील.त्यानंतर कार्यक्रमाचे समारोप बक्षीस वितरण समारंभाणे होईल.
0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *