रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा
स्वच्छतेच्या माध्यमातून दिवसा गावातील व कीर्तनाच्या माध्यमातून रात्री लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची घाण साफ करणारे महान संत म्हणजे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा स्वतः अशिक्षित असुनही शिक्षणाचे महत्व जाणणारे शिक्षण प्रसारक म्हणजे गाडगेबाबा. मराठे,माळी, कुणबी,तेली,चांभार,कुंभार,वडारी ,कैकाडी,बेलदार,गोंड,न्हावी,धो बी,मांग, महार हे शिक्षणा अभावी मागे राहिले असे निक्षूण सांगणारे संत म्हणजे गाडगेबाबा हवा आहे पण ती हिरवी आहे,पिवळी आहे,निळी आहे असे सांगता येत नाही तसेच ती कोठे आहे हे सुद्धा सांगता येत नाही,ती कोठून येते व कोठे जाते याचा पत्ता नाही तसंच परमेश्वराचे आहे त्याला आकार नाही आणि देवळात असलेला देव हा पोट भरण्याचा देव आहे असे कीर्तनातून सांगणारे संत म्हणजे गाडगेबाबा!
तुम्ही मोठ्या भक्तीभावाने गणपती बसवता,वाजत गाजत गणपतीला आणता,त्याला सिंहासनावर बसवता,त्याची पूजा करता,आरती म्हणता,नैवैद्य, मोदक खाऊ घालता व शेवटच्या दिवशी त्याला पाण्यात बुडवता.तुमच्यावर खटला भरला तर फौजदारी दाखल होते. ही भक्ती नाही तर भक्ती म्हणजे देवाचे भजन अशी भक्तीची सोपी व्याख्या करणारे संत म्हणजे गाडगेबाबा धर्मांतराच्या अगोदर डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या निवडक लोकांना भेटले होते त्यातील एक म्हणजे गाडगेबाबा. बाबासाहेबांनी त्यांना धर्मांतराचा विचार बोलून दाखवला व गाडगेबाबांना सल्ला मागितला त्यावेळी बाबासाहेब मी बापा अशिक्षित माणूस आपल्या सारख्या लय शिकलेल्या माणसाला काय सांगणार असे प्रामाणिक मत व्यक्त करणारे संत म्हणजे गाडगेबाबा.गाडगेबाबांनी मनात आणले असते तर ते अनेक संस्था उभारू शकले असते,पण त्यांनी ते न करता मुंबई सारख्या ठिकाणी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी म्हणून धर्मशाळा बांधली.
भंगलेल्या मानवमूर्ती।तयातची ईश्वर भक्ती
मानणाऱ्या गाडगेबाबांची आज पुण्यतिथी, त्यानिमित्त या महान संतास विनम्र अभिवादन!
महेंद्र कराळे-हिवरखेड
Users Today : 32