नातेवाईक व मित्रपरिवार यांचेकडून मदतीचे
मूर्तिजापूर (भूषण महाजन) शहरातील पंचशील वाडीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते दीपक खंडारे यांचा भाचा प्रांजल वाघमारे हा थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त असून त्याला मदतीची गरज आहे.
प्रांजल हा अमरावती जिल्ह्यातील नवसारी येथे महात्मा फुले नगर येथे वास्तव्यास आहे कुटुंबाचे आधार प्रमुख वडील यांचे निधन झाले आहे त्यात थॅलेसेमिया आजाराने प्रांजलवर आक्रमण केले असून त्याला दर १५ दिवसांनी रक्त द्यावे लागत असून त्या दिलेल्या रक्ताच्या भरवश्यावर जीवन जगन्याचा प्रयत्न करत आहे त्याला सुदृढ होण्यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले आहे परंतु ऑपरेशन साठी लागणारा खर्च प्रांजलच्या परिस्थितीनुसार आवाक्या बाहेर असल्याने अशातच वडील हयात नसल्याने ईलाज करण्यासाठी लागणारा खर्च जुळवा जुळव कोण करेल ? असा प्रश्न प्रांजल समोर उभा राहिला यावर नातेवाईकांच्या परिस्थिती एवढया काही बलाढ्य नाहीत त्यामुळे मदत मागायची कुणाला असे अनेक प्रश्न प्रांजलला भेडसावत आहेत अशातच काही नातेवाईक व मित्र मंडळीने पुढाकार घेऊन समाजातील प्रत्येकानी शक्य होईल अशी मदत करण्याचे आवाहन केले आहे आपल्या सर्वांच्या मदतीने प्रांजलला जीवनदान मिळणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी खाली दिलेल्या फोन पे नंबरवर किंवा लिंक वर मदत करावी.असे आवाहन नातेवाईक ,मित्रपरिवार करीत आहेत.फोन पे नंबर – 9503219008,
Users Today : 11