रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
येथील सेंट्रल बँक मध्ये दिनाक 21 डिसेंबर 2022 रोजी बँकेचा 112 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सेंट्रल बँक हिवरखेड चे शाखाधिकारी अनंत पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,सन 1911 मध्ये सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया ही भारतातील पहिली पुर्णतः स्वदेशी भारतीय वाणिज्यिक बैंक होती की जीचे पूर्ण स्वामित्व आणि प्रबंधन हे फक्त भारतीयांच्याच हाती होते. बॅकेचे संस्थापक सर सोराबजी पोचखानावाला यांनी या बँकेची स्थापना करून आपले पहिली स्वदेशी बॅक स्थापनेचे स्वप्न पूर्ण केले. वास्तविकता सर सोराबजी पोचखानावाला यांनी बैंक ची स्थापना करून ते इतके गौरवान्वित झाले कि त्यांनी सेन्ट्रल बैंक ला राष्ट्राची ची संपत्ति आणि देशाची संपदा म्हणुन त्यावेळी घोषित केले. त्यांनी पुढे मांडले की ,सेन्ट्रल बैंक ही फक्त जनतेच्या विश्वासावरच आजवर टिकलेली आहे आणि ही जनतेचीच बँक आहे. .बँकेचे खातेधारक व ग्राहक यांना बँकिंग संबंधित उत्कृष्ट सेवा देण्यालाच प्राथमिकता देण्यात येते असे मत व्यक्त केले.
यावेळी शाखेतील कर्मचारी रूपाली खारोडे , वृत्तिका लाडे , बॅकिंग सहाय्यक मंगेश पुंडकर , ग्राहक प्रतिनिधी सत्यदेवजी गिर्ह , आनंदजी बोहरा, रामकृष्णजी माहोकार , नंदु वाकोडे , नाना माहोकार व इतर ग्राहकगण उपस्थित होते.
Users Today : 32