जैन समाजाच्या सम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्र निर्णयावर तीव्र आक्षेप….

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
सकल जैन समाजाच्या झारखंड राज्यातील पवित्र प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी परिसराला झारखंड शासनाद्वारे पर्यटन क्षेत्र घोषित  करण्याचे  प्रयत्न सुरू असल्याने या  निर्णयावर नंदुरबारसह संपूर्ण राज्य आणि देशातून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.दरम्यान झारखंड राज्य शासन निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवारी नंदुरबार जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झारखंड राज्याचे मुख्यमंत्री तसेच खा. डॉ. हिना गावित,  अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष,    व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हाधिकारी मणिषा खत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झारखंड शासनाने सकल जैन समाजाच्या पवित्र प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी  परिसराला पर्यटन क्षेत्र घोषित केल्यामुळे सकल जैन समाजाच्या धार्मिक स्वतंत्रता आणि मूलभूत अधिकाराला नष्ट करण्याचे  प्रयत्न सुरू आहेत झारखंड शासनाचा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. पर्यटन क्षेत्र घोषित झाल्यामुळे जैन समाजाचे स्थळाची पवित्रता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
   या निर्णयामुळे धार्मिक क्षेत्र पर्यटन क्षेत्र निर्माण होईल.संपूर्ण जैन समाज सम्मेद शिखरजी येथील भूमीवर गेल्यानंतर पवित्रभूमी म्हणून स्वीकार करतात.याच पवित्र भूमीवर 20-20 तीर्थंकरांचे निर्माण  झाले  आहे. याच भूमीचे श्रद्धापूर्वक दर्शन केले जाते.झारखंड शासनाच्या निर्णयामुळे संपूर्ण भारतातील जैन समाजातून निषेध व्यक्त करून संतप्त वातावरण तयार झाले आहे.अहिंसक जैन समाज अल्पसंख्यांक असून अशा निर्णयामुळे जैन समाजाची संस्कृती नष्ट करण्याचे षडयंत्र झारखंड सरकार करीत आहे.पर्यटन क्षेत्र घोषित झाल्यामुळे अनेक  मद्याची  आणि मांस विक्रीची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट उघडली जातील.जैन समाज शांतीप्रिय, अहिंसक आणि देशात सर्वाधिक कर भरणारा समाज आहे.झारखंड शासनाच्या तूघलकी निर्णयामुळे हिंसेचे तांडव नृत्य होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.यामुळे याप्रकरणी केंद्र शासनाने लक्ष घालून झारखंड शासनाचा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी सकल जैन समाज, दिगंबर जैन समाज, श्रीश्रोतांबर मूर्ती पूजक जैन संघ, श्री श्वेतांबर तेरापंथी जैन संघ यांनी केली आहे.निवेदनावर सुरेश जैन, विरल कुवाडिया,पदम  पाटोदी, मदनलाल जैन, प्रकाश कोचर, जेठमल अंबानी यांच्यासह प्रमुख समाज बांधवांच्या स्वाक्षरया आहेत.झारखंड शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ सकल जैन समाजातर्फे शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.या मूक मोर्चात युवकांसह महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले.जैन समाज बांधवांच्या मूक मोर्चाला संबोधित करताना माजी आमदार चंद्रकांत रघुशी यांनी सांगितले की, झारखंड शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे जैन समाज बांधवाच्या भावना पोचविणार असल्याचे  रघुवंशी यांनी सांगितले.
   परमपूज्य उपाध्याय मनीतप्रभ सागरजी महाराज यांनी झारखंड शासनाचा निषेध करीत जैन समाज बांधवांना संबोधित केले.
0 9 4 6 9 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *