सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलचा ब्रँड अॅम्बेसिडर अभिनेता सोनू सुद बनणार…

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नंदुरबार -: सारंगखेडा येथील एकमुखी दत्त यात्रेनिमित्त भरणाऱ्या अश्व बाजार व चेतक फेस्टिव्हलचे उद्घाटनासाठी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी अभिनेता सोनू सुद यांना निमंत्रण दिले आहे . सोनू सुद हे चेतक फेस्टिव्हलचे ब्रँड अॅम्बेसिडर ही होणार आहेत .

  अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली .येथील चेतक फेस्टिव्हल ज्याप्रमाणे अश्वशौकिनांना भूरळ घालत असते . त्याच प्रमाणे बॉलिवुड आणि हॉलिवूड तारकांनाही भूरळ घालत असते . यंदाही सारंगखेडा एकमुखी दत्त यात्रोत्सवानिमित्त अश्व बाजार व चेतक फेस्टिव्हलची तयारी सुरू झाली आहे . चेतक फेस्टिव्हलचे उद्घाटन ८ डिसेंबर ला अभिनेता सोनु सुद यांच्या हस्ते होणार आहे . त्यासाठी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी मुंबई येथे अभिनेता सोनू सुद यांच्या निवासस्थानी भेट देऊन निमंत्रण दिले आहे . यावेळी अश्व बाजाराची व चेतक फेस्टिव्हलची श्रीं . रावल यांनी माहीती दिली . येथे २०१२ पासून दरवर्षी डिसेंबर महिन्यात श्री दत्त प्रभूच्या जयंती निमित्त यात्रोत्सवात चेतक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते . दरवर्षी सिनेसृष्टीतील कलाकार येतात . यंदाही विविध कलाकारांना निमंत्रण दिले जाणार आहे .

अशी माहीती समितीने दिली आहे .

 

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *