प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
सार्वजनिक जीवनात काम करीत असतांना सर्व समाजातील लोकांची सेवा केली आहे. कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. विकास कामांमध्ये भेदभाव केला नाही.शहरात अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेलेत.असे असतांना माळीवाड्याच्या विकास फक्त नगरपरिषदेनेच केलेला आहे. अशी स्पष्टोक्ती बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली.नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी सायंकाळी करण्यात आले त्यानंतर आयोजित कार्यक्रमात माजी आ. रघुवंशी बोलत होते.ते म्हणाले, निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींची नागरिकांशी बांधिलकी पाहिजे.पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून माळीवाड्यातील अनेकांना लाभ मिळवून दिला. परिसरातील लाभार्थ्यांना नावे संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक जगन माळी, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय माळी, नगरसेवक प्रमोद शेवाळे, गंगाबाई माळी,मीना माळी,फारुख मेमन,चेतन वळवी, फरीद मिस्तरी,अतुल पाटील,किरण चौधरी, धर्मेंद्र पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक जगन माळी यांनी केले. प्रसंगी माजी नगरसेवक मोहन माळी,निंबा माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन मनोज माळी तर आभार प्रदर्शन अविनाश माळी यांनी केले.
या कामांचे उद्घाटन
योगेश्र्वरी माता मंदिर सामाजिक भूमिपुजन,माळी समाज सामाजिक सभागृह उद्घाटन, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले दाम्पत्य स्मारक सुशोभिकरण लोकार्पण, संत सावता महाराज मंदिर लगत सभागृह भूमिपुजन, होलार समाज सामाजिक सभागृह वाढीव कामाचे भूमिपुजन,आदिवासी समाज सामाजिक सभागृह वाढीव काम भूमिपुजन,महात्मा फुले पुतळा पासुन देवमढी पर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण भुमिपूजन, देवमढी जवळ पेव्हर ब्लॉक बसविणे भूमिपुजन
Users Today : 47