मळसुर
विवरा येथील वृद्धाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना रविवार,
दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. सदाशिव सुखदेव झोडपे (७७) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गेल्या काही महिन्यांपासून मृत वृद्ध व मुले व पुतण्या यांच्यामध्ये शेतीचा वाद सुरू होता. वाद न्यायालयात सुरू असल्याचा धसका घेऊन मृत सदाशिव – सुखदेव झोडपे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे सुधाकर करवते, राजेश चव्हाण, ज्ञानेश्वर गीते यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यावेळी मृताच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली. ठाणेदारांनी चौकशी
प्रतिक्रिया
आत्महत्या केल्याची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला असती, शेतीचा वाद न्यायालयात सुरु असून, मृतकाच्या खिशात चिठ्ठीत मुलगा व पुतण्या यांच्या कारणामुळे आत्महत्या केल्याचे समोर आल्याने दोघेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.
योगेश वाघमारे, ठाणेदार पोलीस स्टेशन चान्नी
केली असता त्या चिठ्ठीत मृताचा मुलगा समाधान झोडपे, पुतण्या विश्राम झोडपे यांच्यामुळे आत्महत्या केल्याचे समोर आल्याने चान्नी पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मृताचा मुलगा व पुतण्या या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
Users Today : 18