अकोला (भुषण महाजन)
सर्वसामान्य जनतेचे अर्ज, निवेदने व शासन स्तरावर असलेली कामे पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुखता आणण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तरी सर्वसामान्य नागरिकांनी मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहलेले अर्ज, निवेदने इ. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.जिल्हास्तर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी तर नायब तहसिलदार व एक लिपीक टंकलेखक कक्षामध्ये कार्यरत असेल.
या कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेकडून मा.मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन अर्ज, निवेदने, संदर्भ इ. स्विकारले जाईल. प्राप्त अर्ज, निवेदनावर जिल्हास्तरावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक घेऊन प्रकरणे तातडीने निकाली काढले जाईल. तसेच ज्या प्रकरणाची शासन स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षीत आहे, असे वैयक्तीक किंवा धोरणात्मक अर्ज, संदर्भ, निवेदने मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई येथे पाठविण्यात येईल, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.
Users Today : 32