सपोनि देवीदास वाघमोडे यांनी मानलेग्रामस्थांचेआभार सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील फर्दापूर पोलीस स्टेशनच्या वतीने सपोनि देवीदास वाघमोडे व उपनिरीक्षक रणजित कासले फर्दापूरसह गावा गावात अगोदर शांतता कमेटीची बैठका घेऊन सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकारी यानां बोलावून मार्गदर्शन करण्यात आले होते त्याच प्रमाणे परिसरातील सर्व गणेश मंडळाच्या मान्यवरांनी फर्दापूरसह परिसरात गणपती बाप्पा यांची मिरवणूक डिजे मुक्त मिरवणूक शांततेत पार पडली.पोलीस ठाणे फर्दापुर हद्दीतील प्रॉपर फर्दापूर, पळसखेडा, सावळदबारा, टिटवी, जामठी, लेनापुर, सावरखेडा, जंगला तांडा, फर्दापूर तांडा, मोलखेडा, देव्हारी, रवळा, जवळा, वरखेडी तांडा, वरखेडी खुर्द,पिंपळवाडी, चारुतांडा, हिवरी, नादांगाव, नांदा तांडा, घाणेगाव तांडा इत्यादी सर्व गावाच्या एकूण 20 श्री गणेश मिरवणुका डी.जे.मुक्त वातावरणात शांततेत पार पडल्या आहेत. ज्या ज्या गावातील मंडळांनी एक गाव एक गणपती हि संकल्पना राबविण्यात आली असेल त्यांना त्यांचे नावे आम्ही वरिष्ठ कार्यालयात पाठवणार आहोत अशे पण सपोनि देवीदास वाघमोडे यांनी सांगितले. उत्सव मोठ्या उत्साहामध्ये पारंपारिक सांप्रदायिक दिंडी, टाळ,मृदंग, ढोलताशे, लेझीम अशा वाद्यामध्ये सावळदबारा परिसरात व फर्दापूर गावात शांततेत गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करण्यात आला.त्या आदर्श श्रीगणेश मंडळांची बक्षिसाकरिता शिफारस मा. वरिष्ठ कार्यालयात करणार आहोत. सर्व श्रीगणेश मंडळ, पोलीस मित्र, शांतता कमिटीचे सदस्य, सर्व पत्रकार बंधू,ग्रामस्थ, यांचे मनापासुन आभार मानतो.यावेळी सपोनि देवीदास वाघमोडे, उपनिरीक्षक रणजित कासले, सावळदबारा बिटजमादार मिरखाँ तडवी,पो.काँ.शिवदास गोपाळ, पो.पा.विलास कुल्ले,पोलीस कर्मचारी,व मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 11