- सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे जयभवानी नवयुवक मंडळ, जय सरस्वती गणेश मित्र मंडळ व जय बजरंग गणेश मंडळ अशे गावात तीन ते चार मंडळे असून शुद्धा गावात एकच मिरवणूक न डिजे न बाँन्ड लावता शांततेत मिरवणूक पार पडली. चार मंडळाच्या गणपती असून येथील सर्व गणेश मंडळाच्यावतीने आज दि.९ सप्टेंबर रोजी टाळ मृदंगाचा गजर,लेझीम, ढोलताशे व पुष्पांच्या पाकळ्यांची उधळण करून गणेश विसर्जन करण्यात आले.सावळदबारा येथे या वर्षी गणेश मंडळाच्या एक गणपतीची स्थापना करण्यात आली होती.आज विसर्जनाच्या दिवशी मंडळाने डी.जे. बँड व गुलालाची उधळण न करता हारि हारेश्ववर विठ्ठल रुखमिणी मंदिरापासून गणपती बाप्पाची मिरवणूकीला सुरुवात झाली होती. तर चक्रधर स्वामी चौकातून जय सरस्वती गणेश मित्र मंडळ व जय बजरंग मित्र मंडळ यांनी सुरुवात केली होती.असे एका पाठोपाठ ट्रकटर ठेवून गणपती बाप्पा यांचीसुरुवात झाली होती. यावेळी ह.भ.प.वासुदेव महाराज खडके, ह.भ.प.आबाराव महाराज कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली हरिहरी वारकरी ,धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देत सांप्रदायिक पद्धतीने वारकऱ्यांच्या सुमधुर आवाजात अभंग,गवळण गात टाळ मृदंगाच्या गजरात आणि सुगंधित पुष्प फुलांची उधळण करत,सोबत गावकऱ्यांनी लेझिम खेळत अशा भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन,आणि गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर महिलांनी संपूर्ण गावामध्ये रांगोळीने रस्ते सुशोभित केले होते तर महिलांनी जागोजागी पुष्प फुलांनी श्री गणेशाची पूजा केली.अशा या भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांना निरोप सर्व मंडळाच्या मान्यवर व गावकऱ्यांनी दिला आहे.याप्रसंगी मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता फर्दापूर येथील पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास बाळासाहेब वाघमोडे व उपनिरीक्षक रणजित कासले यांच्या मार्गदर्शनाखाली सावळदबारा बिटजमादार मिरखाँ तडवी, पो.काँ.शिवदास गोपाळ, पो.पा.विलास कुल्ले, डि.एन.नप्ते यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अशी माहिती सर्व मंडळाच्या वतीने उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान,प्रा.जीवन कोलते( सामाजिक कार्यकर्ते),पत्रकार गणेश खैरे यांनी प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.
Users Today : 11