2 जानेवारी ते 12 जानेवारी,2023 या कालावधीत नागरिकांच्या प्रवेशास मनाई

Khozmaster
1 Min Read

 नंदुरबार

 बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात असलेल्या फायर बेटावर 2 जानेवारी ते 12 जानेवारी,2023 या कालावधीत जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने या परिसरात नागरिकांना प्रवेशास मनाई असेल, असे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचे व्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात या कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी,असेही जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी  कळविले आहे.

0 9 4 6 9 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *